Get it on Google Play
Download on the App Store

यज्ञयाग 5

''अश्वमेध, पुरूषमेध, सम्यक्पाश, वाजपेय आणि निरर्गल, हे यज्ञ मोठया खर्चाचे आहेत; पण ते महाफलदायक होत नाहीत. बकरे, मेंढे आणि गाई असे विविध प्राणी ज्यांत मारले जातात, त्या यज्ञाला सद्वर्तनी महर्षि जात नाहीत. परंतु ज्या यज्ञांत प्राण्यांची हिंसा होत नाही, जे लोकानां आवडतात, आणि बकरे, मेंढे, गाई वगैरे विविध प्राणी ज्यांत मारले जात नाहीत, अशा यज्ञांत सद्वर्तनी महर्षि उपस्थित होतात. म्हणून सूज्ञ पुरूषाने असा यज्ञ करावा. हा यज्ञ महाफलदायक आहे. कारण ह्या यज्ञाच्या यजमानाचें कल्याण होतें, अकल्याण होत नाही. आणि तो यज्ञ वृध्दि पावतो, व देवता प्रसन्न होतात.''

यज्ञांत पाप कां?

यज्ञांत प्राणिवध केल्याने कायावाचामनें यजमान अकुशल कर्मांचें आचरण करतो, म्हणून यज्ञ अमंगळ आहे, असें बुध्दाचें म्हणणें होतें. यासंबंधी अंगुत्तर निकायाच्या सत्तकनिपातांत एक सुत्त सापडतें. त्यांचे रूपांतर येणेंप्रमाणे -

एके समयीं भगवान् श्रावस्ती येथे जतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत राहत होता. त्या वेळीं उद्भतशरीर (उग्गतसरीर) ब्राह्मणांने महायज्ञाची तयारी चालविली होती. पांचशें बकरे आणि पांचशें मेंढे यज्ञांत बलि देण्याकरितां यूपाना बांधले होते. तेव्हा उद्भतशरीर ब्राह्मण भगवंतापाशी येऊन, भगंवतांना कुशल प्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला, आणि म्हणाला, ''भो गोतम, यज्ञासाठी अग्नि पेटविणें आणि यूप उभारणें महत्फलदायक होते. असें मीं ऐंकलें आहे.''

भगवान् म्हणाला,''हे ब्राह्मणा, यज्ञासाठी अग्नि पेटविणें आणि यूप उभारणे महत्फलदायक होतं असे मीही पण ऐंकले आहे.''

हेच वाक्य ब्राह्मणाने आणखी दोनदा उच्चारलें, आणि भगवंताने त्याला तेच उत्तर दिलें. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, ''तर मग आपणा दोघांचे सूर्वथैव जुळतें.''

त्यावर आनंद म्हणाला,''हे ब्राह्मणा, हा तुझा प्रश्न बरोबर नाही. 'मी असें ऐकलें आहे,' असें न म्हणतां तूं असें म्हण, 'यज्ञासाठी मी अग्नि पेटविण्याच्या व यूप उभारण्याच्या प्रयत्नांत आहें, यांसंबधीं भगवंताने मला असा उपदेश करावा की, ज्यामुळे माझें चिरकाल कल्याण होईल.”

आनंदाच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला तेव्हा भगवान् म्हणाला, ''जो यज्ञासाठी अग्नि पेटवितो, व यूप उभारतो, तो दु:खोत्पादक तीन अकुशल शस्त्रें उगारतो. तीं कोणतीं तर कायशस्त्र, वाचाशस्त्र आणि चित्तशस्त्र. जो यज्ञाला सुरवात करतो, त्याच्या मनांत इतके बैल, इतके गोहरे, इतक्या कालवडी इतके बकरे, इतके मेंढे मारण्यांत यावे, असा अकुशल विचार उद्भवतो. याप्रमाणे तो सर्वात प्रथम दु:खोत्पादक अकुशल चित्तशास्त्र उगारतो. नंतर हे प्राणी मारण्याला तो आपल्या तोंडाने आज्ञा देतो, आणि त्या योगें दु:खोत्पादक अकुशल वाचाशस्त्र उगारतो. तदनंतर त्या प्राण्यांना मारावें म्हणून प्रथम आपणच त्या त्या प्राण्यांस मारण्यास आरंभ करतो, आणि त्या योगें दु:खोत्पादक अकुशल कायशस्त्र उगारतो.

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1 आत्मवाद 2 आत्मवाद 3 आत्मवाद 4 आत्मवाद 5 आत्मवाद 6 आत्मवाद 7 आत्मवाद 8 आत्मवाद 9 आत्मवाद 10 आत्मवाद 11 आत्मवाद 12 कर्मयोग 1 कर्मयोग 2 कर्मयोग 3 कर्मयोग 4 कर्मयोग 5 कर्मयोग 6 कर्मयोग 7 कर्मयोग 8 कर्मयोग 9 कर्मयोग 10 कर्मयोग 11 यज्ञयाग 1 यज्ञयाग 2 यज्ञयाग 3 यज्ञयाग 4 यज्ञयाग 5 यज्ञयाग 6 यज्ञयाग 7 यज्ञयाग 8 यज्ञयाग 9 यज्ञयाग 10 यज्ञयाग 11 यज्ञयाग 12 यज्ञयाग 13 जातिभेद 1 जातिभेद 2 जातिभेद 3 जातिभेद 4 जातिभेद 5 जातिभेद 6 जातिभेद 7 जातिभेद 8 जातिभेद 9 जातिभेद 10 जातिभेद 11 जातिभेद 12 जातिभेद 13 जातिभेद 14 जातिभेद 15 मांसाहार 1 मांसाहार 2 मांसाहार 3 मांसाहार 4 मांसाहार 5 मांसाहार 6 मांसाहार 7 मांसाहार 8 मांसाहार 9 मांसाहार 10 दिनचर्या 1 दिनचर्या 2 दिनचर्या 3 दिनचर्या 4 दिनचर्या 5 दिनचर्या 6 दिनचर्या 7 दिनचर्या 8 दिनचर्या 9 दिनचर्या 10 दिनचर्या 11 दिनचर्या 12 *परिशिष्ट 1 *परिशिष्ट 2 *परिशिष्ट 3 *परिशिष्ट 4 *परिशिष्ट 5 *परिशिष्ट 6 *परिशिष्ट 7 *परिशिष्ट 8 *परिशिष्ट 9 *परिशिष्ट 10 *परिशिष्ट 11 *परिशिष्ट 12 *परिशिष्ट 13 *परिशिष्ट 14 *परिशिष्ट 15 *परिशिष्ट 16 *परिशिष्ट 17 *परिशिष्ट 18 *परिशिष्ट 19 *परिशिष्ट 20 *परिशिष्ट 21 *परिशिष्ट 22 *परिशिष्ट 23