भाग ३ रा 61
६०
महानाम शाक्य
“उत्तम दान देणार्या उपासकांत महानामशाक्य श्रेष्ठ आहे.”
ह्याची माहिती अनुरुद्धाच्या गोष्टींत (प्रकरण५) आलीच आहे. भगवान् भिक्षुसंघासह कपिलवस्तूला जात असे, तेव्हां त्याची व भिक्षुसंघाची तरतूद लावण्याच्या कामीं हाच पुढाकार घेत असे. एका चातुर्मासांत त्यानें भिक्षुसंघाला औषधी पदार्थ पुरविण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती, ही हकिगत दुसर्या भागांत (कलम ९६) आलीच आहे. ह्याला उद्देशून भगवंतानें उपदेशिलेलीं पुष्कळ सुत्तें सुत्तपिटकांत आहेत. उपदेशाच्या दृष्टीनें त्यांचें महत्त्व फार आहे. परंतु त्यामुळें महानामाच्या चरित्रावर विशेष प्रकाश पडत नाहीं.
६१
उग्ग गृहपति वैशालिक
“आवडते पदार्थ देणार्या उपासकांत उग्ग गृहपति वैशालिक श्रेष्ठ आहे.”
हा वैशाली येथें श्रेष्ठिकुलांत जन्मला. हा गुणांनीं व शरीरानें उग्दत (उंच) होता, म्हणून त्याला उग्ग असेंच म्हणत असत. त्याची आणि भगवंताची गांठ कशी पडली, व तो कशा प्रकारचा उपासक झाला, ह्याचें वर्णन अंगुत्तर निकायाच्या अट्ठनिपाताच्या एकविसाव्या सुत्तांत सांपडतें. त्याचा सारांश असा :-
एके समयीं भगवान् बुद्ध वैशाली येथें महावनांत कूटागारशालेंत रहात होता. तेथें तो भिक्षूंना उद्देशून म्हणाला, “भिक्षुहो, वैशालिक उग्ग गृहपति आठ उत्तम गुणांनी समन्वित आहे, असें समजा.” असें बोलून तो विहारांत गेला.
तेथें हजर असलेला एक भिक्षु सकाळच्या प्रहरीं वैशालींत पिंडपाताला गेला असतां उग्गगृहपतीच्या घरीं येऊन तेथें त्याच्यासाठीं मांडलेल्या आसनावर बसला, व त्याला नमस्कार करून उग्ग एका बाजूला बसला. तेव्हां त्या भिक्षूनें त्याला प्रश्न केला की, तूं आठ गुणांनी समन्वित आहेस, असें भगवान् म्हणाला. ते आठ गुण कोणते बरें?