भाग ३ रा 76
पंधराव्या दिवशीं सकाळीं उत्तरा स्वयंपाकांत गुंतली होती. आणि तिचा नवरा सिरिमेबरोबर गप्पागोष्टी करीत गच्चीवर बसला होता. उत्तरेनें खिडकींतून त्याच्याकडे पाहिलें. ‘अशा संपत्तीचा त्याग करून स्वयंपाकाच्या धुरानें आपलें तोंड काळें करून घेणारी व दासींबरोबर काम करणारी ही स्त्री मोठी अभागी असली पाहिजे,’ असा विचार मनांत येऊन तिचा नवरा जरासा हंसला. ‘हा आपल्या संपत्तिमदानें मत्त होऊन राहिला आहे,’ हें पाहून उत्तराहि हांसली.’ तें पाहून, ‘ही चेटिका मी येथें असतांना माझ्या पतीबरोबर हंसते खिदळते काय,’ असें म्हणत कोपानें आणि त्वरेनें सिरिमा खालीं उतरली! तिच्या त्या चालीवरूनच उत्तरेनें ताडलें कीं, ह्या पंधरवड्यांत हिला, ‘आपण मालकीणच आहें’ असें वाटूं लागलें असलें पाहिजे! आणि त्याच वेळीं सिरिमेवर मैत्रीचें ध्यान करून ती तेथें उभी राहिली.
दासीगणांत शिरून मोठ्या पळ्यानें कढईतील तापलेलें तेल घेऊन सिरिमेनें ते उत्तरेच्या डोक्यावर ओतले! परंतु मैत्रीध्यानाच्या प्रभावानें उत्तरेला त्याची बाधा न होतां पद्मपत्रावरील पाण्याच्या बिंदूप्रमाणें तें निसटून खालीं पडले. तेव्हां जवळ असलेल्या दासी सिरिमेला म्हणाल्या, “वा ग वा! आमच्या मालकिणीकडून पैसे घेऊन ह्या घरांत आलीस, आणि आतां स्वतःच मालकीण होऊं पहातेस काय?”
असें म्हणत एका मागून एकीनें येऊन त्यांनी सिरिमेवर यथेच्छ प्रहार चालविले. त्या वेळीं सिरिमेनें आपला दर्जा ओळखला, व जाऊन उत्तरेच्या पायाशीं उडी टाकली, व पायां पडून तिची क्षमा मागितली. उत्तरा म्हणाली, “सिरिमाबाई, ह्या बाबतींत मी तुला क्षमा करणार नाहीं. मी कुलीन स्त्री आहें, हें तूं लक्षांत ठेव. जर भगवंतानें तुला क्षमा केली तर मी करीन.”
इतक्यांत भगवान् भिक्षुसंघासह भिक्षेसाठीं तेथें आला. त्याच्या पायां पडून सिरिमेनें घडलेली हकीगत त्याला निवेदित केली, व त्याची क्षमा मागितली. त्यानें क्षमा केल्यावर उत्तरेनेंहि तिच्या अपराधांची क्षमा केली. तेवहा भगवान् म्हणाला, “क्षमेनें क्रोधाला जिंकावें; दुर्जनाला साधुत्वानें जिंकावें; कृपणाला दानानें जिंकावें, व सत्यानें लबाडाला जिंकावें.”१
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ मूळ गाथा धम्मपदांत आहे ती अशी:- अक्कोधेन जिने कोधं, असाधुं साधुना जिने । जिने कदरियं दानेन, सच्चनालिकवादिनं ।।

दुसरी एक वेळुकंटक शहरांत रहाणारी वेळुकंटकी नंदमाता नांवाची ऋद्धिमती उपासिका होती, असें अंगुत्तर निकायांतील कित्येक सुत्तांवरून दिसून येतें. तिला आणि खुज्जुत्तरेला उपासिका वर्गांत भगवंतानें अग्रस्थान दिलें आहे. तेव्हां ती व उत्तरा नंदमाता ह्या दोघी एकच असाव्या, अशी बळकट शंका येते. अट्ठकथांच्या वेळीं मूळ गोष्टींत बरेच फेरफार होऊन वरील गोष्ट रचण्यांत आली असावी.