अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3
या शीलांच्या अनुस्मृतीचा फायदा हा की, प्रथमतः आपले शील अत्यंत परिशुद्ध ठेवण्याचा सावधानपणा ठेवला पाहिजे; आणि त्याच्यावर ध्यान केले असता उपचारसमाधी प्राप्त होते, एवढेच नव्हे, तर आमरण आपले शील शुद्ध ठेवण्याचा दृढ निश्चय वृद्धिंगत होतो.
त्यागानुस्मृतीचे विधान येणेप्रमाणे ः- अरियसावको अत्तनो चागं अनुस्सरति लाभा वत मे सुलद्धं वत मे योऽहं मच्छेरमलपरियुट्ठिताय पजाय विगतमलमच्छेरेन चेत्तसा अगारं अज्झावसामि मुत्तचागो पयतपाणि वोस्सग्गरतो याचयोगो दानसंविभागरतो ति । आर्यश्रावक आपला त्याग अनुस्मरतो ः- हा मला अलभ्य लाभ आहे, जो मी मात्सर्यमलाने भरलेल्या जगात मात्सर्यापासुन मुक्त झालेल्या चित्ताने, मुक्तत्याग, सिद्धहस्त, दानरत, याचकप्रिय आणि दानसंविभागरत होऊन गृहस्थाश्रमात रहातो.
'चेतसा अगारं अज्झावसामि' याच्याबद्दल विणुद्धिमार्गात 'चेतसा विहरामि' असा फरक केला आहे. त्याचे कारण ही स्मृति भिक्षूंनाही उपयोगी पडावी असा ग्रंथकाराचा हेतु आहे. आरंभी या स्मृति केवळ उपासक आणि उपासिका यांच्यासाठीच असत. परंतु बुद्धघोषाचार्याच्या वेळी त्या भिक्षूंनाहि लागू करण्यात आल्या, व त्यामुळे वरील फरक करावा लागला.
त्यागानुस्मृतीचा फायदा हा की, प्रथमतः मात्सर्यविरहित शुद्ध मनाने आर्यश्रावकाने दानधर्म करण्यास शिकले पाहिजे. यायोगे त्याचा अहंकार कमी होऊन मनुष्यजातीवर निष्काम प्रेम करण्याचे सामर्थ्य वाढत जाते; आणि ज्या ज्या वेळी तो अशा शुद्ध आत्मयज्ञाचे स्मरण करतो त्या त्या वेळी त्याला उपचारसमाधी मिळते, एवढेच नव्हे, तर सत्कार्यासाठी देहत्याग करण्यालाहि त्याच्या मनाची तयारी होत जाते.
देवतानुस्मृतीचे विधान येणेप्रमाणे ः- अरिसावको देवतानुस्सति भावेतिसन्ति देवा चातुम्महाराजिका, सन्ति देवा तावतिंसा, सन्ति देवा यामा, सन्ति देवा तुसिता, सन्ति देवा निम्मानरतिनो, सन्ति देवा तावतिंसा, सन्ति देवा यामा, सन्ति देवा तुसिता, सन्ति देवा निम्मानरतिनो, सन्ति देवा परनिम्मितवसवत्तिनो, सन्ति देवा ब्रह्मकायिका, सन्ति देवा तदुत्तरि । यथारूपाय सद्धाय समन्नागता ता देवता इतो चुता तत्थ उपपन्ना, मय्हम्पि तथारूपा सद्धा संविज्जति । यथारूपेन सीलेन समन्नागता ता देवता इतो चुता तत्थ उपपंन्ना, मय्हम्पि तथारूपं सीलं संविज्जति, । यथारूपेन सुतेन समन्नागता ता देवता इतो चुता तत्थ उपपन्ना, मय्हम्पि तथारूपं सुतं संविज्जति । यथारुपेन चागेन समन्नागता ता देवता इतो चुता तत्थ उपपन्ना, मय्हम्पि तथारुपी चागो संविज्जति । यथारूपाय पञ्ञाय समन्नागता ता देवतां इतो चुता तत्थ उपपन्ना; मय्हम्पि तथारूपा पञ्ञा संविज्जती ति ।