कुत्रा आणि मांजर
एका माणसाच्या घरी एक कुत्रा आणि एक मांजर अशी दोन जनावरे होती. ती लहानपणापासून एकमेकांच्या ओळखीची असल्यामुळे ती एकमेकांशी गोडीगुलाबीने वागत असत. त्यांच्या चेष्टा व खेळणे पाहून घरातील माणसांना मोठी मजा वाटत असे. परंतु काही तरी खाण्याचा पदार्थ दिसला म्हणजे मात्र तो घेण्यासाठी ती दोघे मोठमोठ्याने गुरगुरून व अंग फुगवून भांडण करत असत.
तात्पर्य
- स्वार्थाचा प्रश्न उत्पन्न झाला की, मैत्री क्वचितच टिकते.