जॉन राफेल आणि टावर पेड
बिर्मिघम इंग्लंड च्या पीटर ह्यूम ला १६४६ मध्ये स्कॉटिश सीमेवर आपल्या सैनिक पदावर तैनात केलेल्याच्या जीवनाशी निगडीत स्वप्न पडू लागली . तो तो क्रोम्वेल्च्या सेनेचा सैनिक
होता आणि त्याच नाव जॉन राफेल होतं . संमोहन केल्यावर ह्युम्ने इतर ठिकाणी व विवरण आठवली . ज्या जागा त्याला आठवू लागल्या होत्या त्या जागी तो आपल्या भावाबरोबर
जावू लागला आणि त्या अनेक अशा वस्तू मिळाल्या जिचा वापर त्याकाळी होत होता . हॉर्स स्पर्स इत्यादी .
एका गावातील इतिहासकाराच्या मदतीने त्याने सांगितलं कि ह्या चर्चजवळ एक टॉवर असायचा ज्याच्या खाली एक येवच झाड होतं . हि माहिती सार्वजनिक नव्हती आणि म्हणून
इतिहासकार हैराण होता कि ह्युम्ला ह्या गोष्टींची माहिती आहे . चर्च टॉवर ला १६७६ मध्ये तोडून टाकले होते . स्थानिक माहितीनुसार जॉन राफेल ने चर्च मध्ये लग्न केलं होतं . एका
इतिहासकाराने - रोनाल्ड हटणे ह्याबाबत पडताळणी केली आणि संमोहनाच्या माध्यमातून ह्युम्ला त्या लग्नाचे काही प्रश्न विचारले . हटला पर्ण विश्वास नाही बसला कि ह्युम्ला
त्याच्या पुनर्जन्मा विषयी काही माहिती आहे कारण बर्याच प्रश्नाच उत्तर त्याने समाधानकारक दिलं नाही .