उपग्रहांचे प्रक्षेपण
या परिस्थितीत कोरोट, केप्लर आणि टेरेस्ट्रीयल प्लेनेट फाईण्डर या उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतर बदल घडून येण्याची शक्यता आहे. हे तीन उपग्रह अंतराळात पृथ्वी सारखे शेकडो ग्रह शोधण्याची क्षमता राखून आहेत. कोरोट आणि केप्लर पृथ्वी सारखे ग्रह आपल्या मातृ ताऱ्याच्या समोर आल्यानंतर मातृ ताऱ्याच्या प्रकाशात आलेली कमी मोजण्यात सक्षम आहेत. पृथ्वी सारखे ग्रह दिसणार नाहीत परंतु त्यांच्यामुळे आलेल्या मातृ ताऱ्याच्या प्रकाशातील परिवर्तनाला नोंदता येऊ शकते.
फ्रेंच उपग्रह कोरोट डिसेंबर २००६ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला आणि हा उपग्रह म्हणजे या क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरला आहे, कारण सौर बाह्य ग्रह शोधण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आलेला हा पहिला उपग्रह आहे. या उपग्रहाच्या मदतीने शास्त्रज्ञांना पृथ्वीसारख्या १० ते ४० ग्रहांच्या शोधाची आशा आहे. जर पृथ्वीसारखे सौरबाह्य ग्रह असले, तर ते वायू ग्रह नसून पर्वत मे असतील आणि पृथ्वीपेक्षा थोडेसेच मोठे असतील. कोरोट कदाचित गुरु सारख्या मोठ्या ग्रहांच्या संख्येत भर घालू शकेल जे या आधीच शोधण्यात आलेले आहेत. कोरोट प्रत्येक आकाराच्या आणि प्रत्येक प्रकारच्या सौर बाह्य ग्रहांना शोधण्यात सक्षम आहे जे आपण दुर्बिणीद्वारे पाहू शकत नाही. या उपग्रहाच्या मदतीने वैज्ञानिक १२००० ताऱ्यांचे निरीक्षण करू इच्छित आहेत.