अनुपाताचा का सिद्धांत
अनुपाताच्या सिद्धांताने आपण पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्याच्या आकाराचे मोजमाप करू शकतो आणि संभवतः अंतराळातील परग्रही जीवांच्या आकाराचे देखील. कोणत्याही प्रण्याद्वारे उत्सर्जित होणारी उष्णता त्या प्राण्याच्या शरीराच्या पृष्ठ भागाच्या प्रमाणात वाढते. त्यामुळेच आकार १० पट वाढवल्यास उष्णतेचा क्षय 10 x 10 = 100 पट जास्त होतो. परंतु शरीरात उष्णतेची मात्रा क्षेत्रफळाच्या प्रमाणात होते अर्थात 10 x 10 x 10 = 1000. मोठे प्राणी हे छोट्या प्राण्यांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात उष्णतेचा क्षय करू शकतात कारण मोठ्या प्राणांचे पृष्ठफळ छोट्या प्राण्यांच्या तुलनेत कमी असते. थंड ऋतू मध्ये आपले कान आणि बोटे सर्वात आधी थंड पडतात कारण त्यांचे पृष्ठफळ जास्त असते. छोट्या व्यक्ती मोठ्या व्याक्रींच्या तुलनेत लवकर थंड पडतात. वर्तमान पत्र जास्त पृष्ठफळ असल्यामुळे लवकर जळते तर लाकडाचा तुकडा कमी पृष्ठफळ असल्याने हळू जळते.
डिस्ने चा चित्रपट "हनी आय श्रंक द किड्स" मध्ये एका परिवारातील मुले मुंगीच्या अकरा एवढी लहान होतात. एक पावसाळी वादळ आल्यावर आपण पाण्याच्या छोट्या थेम्बाना डबक्यात पडताना पाहतो. प्रत्यक्षात फवार्याचे छोटे थेंब मुन्गीसाठी छोटे नसून एक विशालकाय गोलाकार असेल. आपल्या जगात पाण्याचा अर्धगोलाकार थेंब अस्थायी असतो. परंतु सूक्ष्म संसारात पृष्ठाचा तणाव जास्त असतो त्यामुळे तो स्थायी असतो.
याच प्रकारे आपण अंतराळात मोठ्या प्रमाणात भौतिक शास्त्राच्या नियमांनुसार परग्रही प्राण्यांचा पृष्ठभाग आणि पृष्ठाफळाच्या प्रमाणाचे मोजमाप करू शकतो. या सिद्धांतावरून आपण एवढे नक्की सांगू शकतो की परग्रहावरील जीव हे विशालकाय असू शकत नाहित. ते आकाराने पृथ्वीच्या जीवांच्या प्रमाणातच असतील. अर्थात व्हेल मासा आकाराने खूप मोठा असतो परंतु तो कमी किंवा उथळ पाण्यात आल्यावर स्वतःच्याच भाराने दबून मरू देखील शकतो. वर्तमानात सर्वात मोठा भूचर प्राणी आफ्रिकन हत्ती आहे जो ३.९६ मीटर इतका उंच आहे. सर्वांत मोठा ज्ञात डायनासोर सौरोपोडा होता जो १२ मीटर उंच होता आणि २५ मिईतर पर्यंत लांब असू शकत होता.
अनुपाताचा सिद्धांत हे देखील सांगतो की जसे आपण सूक्ष्म संसारात अजून खोलवर जातो, भौतिक शास्त्राचे नियम बदलत जातात. क्वांटम सिद्धांत इतका विचित्र आहे की तो ब्रम्हांडाच्या व्यावहारिक बुद्धीच्या नियमांचे पालन करत नाही. अनुपाताच्या सिद्धांतानुसार विज्ञान गल्प चे एका विश्वाच्या आत दुसऱ्या विश्वाचा सिद्धांत अमान्य आहे, ज्यामध्ये एका परमाणु च्या आत संपूर्ण ब्रम्हांड असू शकते किंवा आपली आकाशगंगा एखाद्या दुसऱ्या मोठ्या आकाशगंगेचा एक सूक्ष्म हिस्सा असू शकते. "मेन इन ब्लेक" च्या अंतिम दृश्यात कॅमेरा पृथ्वीवरून दूर जात जात ग्रहांना मागे टाकत, तारे, आकाशगंगेला आणि ब्राम्हांडाला मागे टाकत टाकत जातो, आणि शेवटी सगळे ब्रम्हांड दानावकर पराग्रहिंच्या खेळातील एका छोट्याशा चेंडूच्या रुपात दिसते. "मेन इन ब्लेक" च्या एका अन्य दृश्यात एक संपूर्ण आकाशगंगा मांजराच्या गळ्यात बांधलेली दिसते.