Get it on Google Play
Download on the App Store

श्री ओक यांचे मत

या चार श्लोकांचा अर्थ लावताना श्री ओक यानी अनेक गोंधळ केले आहेत हवा तसा अर्थ लावला आहे.

या चार श्लोकांमध्ये काय प्रष्न वर्णिला आहे याचे त्यांचे वर्णन असे आहे.

Problem

Abhijit (Vega), younger sister of Rohini (Aldebaran), desiring seniority (over Rohini?) went to the forest to perform austerities. Thus, Abhijit (Vega) slipped/moved from the sky. At that time (as a result) Indra approached Skandha and asked Skandha to discuss the matter with Brahma. Brahma ordained the beginning of time from Dhanishtha (Sualocin), while previous to this incident the beginning of time was from Rohini and the appropriate number of nakshatras existed (for time reckoning). Being told like this by Indra, Krittika (Pleiades), the nakshatra with Agni as its deity and with the shape of a cart (or with seven heads) became happy and went up in the sky.

या चार श्लोकांचे भाषांतर डॉ. वर्तक यानीस्वयंभूया त्यांच्या पुस्तकात व्यवस्थित दिले आहे त्याचा अर्थहि दिला आहे. त्यांचे श्री. ओक यानी आपल्या पुस्तकात उद्धृत केलेले English भाषांतर असे आहे --

Contesting Abhijit (Vega), the daughter-like younger sister of Rohini

(Aldebaran) went to Vana (i.e. water) for heating the summer (ta-

pa) because she was desirous of seniority. I do not understand anything.

I wish you good luck, but I must tell that the star Abhijit

has slipped down from the sky. This is a distant time but you

(Skandha) think of it with Brahma. At that time Brahma had reck-

oned the time, placing Dhanishtha at the top of the list of

nakshatras. Rohini was also given first place in the past. I have ga-

thered this much knowledge (Sankhya). When Indra talked like this,

Krittika went to the heaven (i.e. attained the highest respectable

position). That seven-headed constellation whose deity is fire (Ag-

ni) is still glittering.

हे भाषांतर योग्य आहे. डॉ. वर्तक यानी वन शब्दाचा पाणी हा अर्थ लावला आहे तो सहज सुचणारा नाही! येथे तो अचूक वाटतो. पाण्यापाशी गेलेली रोहिणीची धाकटी बहीण देवी कोण हे त्यानी सांगितलेले नाही पण अभिजितला ते स्थान दिलेले नाही. मूळ श्लोकामध्येनक्षत्र गगनातून पडले आहेअसे म्हटले आहे पण कोणते नक्षत्र हे सांगितलेले नाही. डॉ. वर्तक यानी अभिजितचे पतन सुचवले आहे. डॉ. वर्तकब्रह्मदेवाने कालरचना धनिष्ठाला प्रथम स्थान देऊन पूर्वी केली होतीअसे इंद्र स्कंदाला म्हणाला असा अर्थ करतात.

डॉ. वर्तकांचे भाषांतर लावलेला अर्थ श्री. ओक यानी कारण देता धुडकावला आहे.

रोहिणीची धाकटी बहीण तपाला जाण्याऐवजी श्री ओक अभिजितलाच रोहिणीची बहीण (भाऊ नव्हे!) बनवून वनात पाठवतात. त्यालाच ते मग अभिजितचे पतनहि म्हणतात. ब्रह्मदेवाने पूर्वी धनिष्ठापासून सुरवात असलेली कालरचना केली होती ती ते या संवाद प्रसंगी झाली असे म्हणतात. एकूण श्लोकांतील वर्णन श्री ओक यांनी वर्णिलेला ‘Problem’ यांचे काहीच नाते नाही.

नक्षत्रे २७ कीं २८ याबद्दल श्री. ओक यानी असे म्हटले आहे कीं दोन्ही प्रकारचे उल्लेख इतरत्र आहेत. आणि या प्रसंगी अभिजित नक्षत्रांच्या यादीतून वगळला जाऊन त्याचे जागी कृत्तिकांचा समावेश केला गेला नक्षत्रे २७ राहिली असे ते म्हणतात.

या सर्व लिखाणात मूळ श्लोकांशी कशाचा काही मेळ नाही. काहीतरी करून, या इंद्र-स्कंद संवादाचा काळ त्याना जास्तीत जास्त मागे रेटावयाचा आहे असे दिसते! त्यांच्या प्रत्येक प्रतिपादनाचा आढावा घेण्यात काही अर्थ नाही.