Get it on Google Play
Download on the App Store

महाभारत युद्धाचे वर्ष व तारीख

महाभारत युद्धाचे वर्ष व तारीख या मुख्य विषयावर श्री. ओक यानी आपल्या पुस्तकात विस्तृतपणे लिहिले आहे. दोन्ही भागांबद्दल मी एकत्रितपणे विचार मांडणार आहे कारण पुनरुक्ति होईल.
यापूर्वी अनेक संशोधकानी आपल्या विचारांप्रमाणे वेगवेगळी वर्षे सुचविलेली आहेत. श्री. ओक यानी स्वतःचे वर्ष न ठरवतां इतरानी ठरवलेल्या वर्षांची तपासणी करून त्यातूनच आपले वर्ष निवडले आहे इतरानी सुचवलेल्या वर्षांपैकी जी ‘अरुंधतीच्या कालखंडा’चे बाहेर असतील ती सर्व त्यानी प्रथमच बाद ठरवलीं आहेत. त्या कालखंडात बसणारी दोनच वर्षे त्यानी पुढे तपासलीं आहेत. त्यांतील एक श्री. लेले यांचे वर्ष त्यानी कारणे स्पष्ट न करताच नाकारले आहे. उरलेले एक, डॉ. प. वि. वर्तक यानी ठरवलेले वर्ष, त्यानी मान्य केले आहे व महाभारतातील अनेक ज्योतिर्गणिती उल्लेख त्या वर्षासाठीच तपासले आहेत व ते सर्व नीट जुळतात असा दावा केला आहे. ते वर्ष आहे अ अ अ अ
श्री. ओक यांचे सर्व निष्कर्ष मला मान्य नसले तरीहि हे वर्ष काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. मला स्वतःला दुसरे एखादे वर्ष सुचवावयाचे नाही. तेवढा माझा अभ्यासहि नाही व तपासण्याची साधनेहि नाहीत. म्हणून मी जेथे श्री. ओक यांचे निष्कर्ष मला पटले नाहीत त्यांबद्दलच लिहिणार आहे.
अरुंधती.वसिष्ठाचे पुढे असण्याचा जो कालखंड श्री. ओक यानी निश्चित केला आहे तो मी माझ्या पद्धतीने तपासला आहे व तो मला बरोबर वाटतो.
त्या कालखंडात न बसणारे वर्ष आपोआप बाद व्हावे हे मात्र मला मान्य नाही. संशोधकाने सर्व भर ज्योतिर्गणितावरच ठेवला असेल तर ते योग्य पण जर इतर शास्त्रांच्या आधारावर वर्ष सुचवले व अभ्यासले असेल तर ते तपासण्यासाठी त्याच शास्त्रावर भर दिला पाहिजे. अर्थात श्री ओकानी जे इतर सर्व दावे एकजात नाकारले आहेत त्यांबदल मी स्वतः काही मत बनवू शकत व इच्छितहि नाही.