प्रभू श्रीरामाचा थायलंडशी संबध काय ?
वाल्मिकी रामायण एक धार्मिक ग्रंथ असण्याच्या सोबतच एक ऐतिहासिक ग्रंथ देखील आहे. कारण महर्षी वाल्मिकी रामाचे समकालीन होते, रामायणाच्या बालकांड च्या सर्ग ७०, ७१
आणि ७३ मध्ये राम आणि त्याच्या तीनही भावांच्या विवाहाचे वर्णन आहे, ज्याचा सारांश आहे.
मिथिलेचा राजा सिरध्वज होता, ज्याला लोक विदेह असे देखील म्हणत असत, त्याच्या पत्नीचे नाव सुनेत्रा (सुनयना) होते, ज्यांची कन्या होती सीता, जिचा विवाह रामाशी झाला होता.
राजा जनकाचा कुशध्वज नावाचा भाऊ होता. त्याची राजधानी सांकश्य नगर होती जी इक्शुमती नदीच्या किनारी होती. त्यांनी आपली कन्या उर्मिला हिचा लक्ष्मणाशी, मांडवी हिचा भरतशी
आणि श्रुतिकीर्ती हिचा शत्रुघ्नाशी विवाह करून दिला होता.
केशव दास रचित "रामचंद्रिका" - पान ३५४ (प्रकाशन संवत १७१५) नुसार, राम आणि सीतेचे पुत्र लाव आणि कुश, लक्ष्मण आणि उर्मिलेचे पुत्र अंगद आणि चंद्रकेतू, भरत
आणि मांडवी चे पुत्र पुष्कर आणि तक्ष, शत्रुघ्न आणि श्रुतिकीर्ती चे पुत्र सुबाहु आणि शत्रुघात हे होते.