खरे रामराज्य
बौद्ध असूनही थायलंडचे लोक आपल्या राजाला रामाचे वंशज असल्या कारणाने विष्णूचा अवतार मानतात, त्यामुळे, थायलंड मध्ये एक प्रकारे राम राज्य आहे. तिथल्या राजाला भगवान श्रीरामाचा वंशज मानले जाते. थायलंड मध्ये संवैधानिक लोकशाहीची स्थापना १९३२ मध्ये झाली.
भगवान रामाच्या वंशजांचे स्थान असे आहे की त्यांना खाजगी अथवा सार्वजनिक पातळीवर कधीही विवाद किंवा आलोचना यांच्या फेऱ्यात आणले जाऊ शकत नाही, कारण ते पूजनीय आहेत. थाई शाही सदस्यांच्या सन्मुख त्यांच्या सन्मानार्थ थाई जनता ताठ उभी राहू शकत नाही, तर त्यांना वाकून उभे राहावे लागते. त्यांच्या तीन कन्यांपैकी एक हिंदू धर्माची मर्मज्ञ मानली जाते.