सुवर्णभूमी विमानतळ
आपण आपले दुर्भाग्य समजावे की आपली कमजोरी काळात नाही, पण भारत हिंदू देश असूनही आणि बहुसंख हिंदू असूनही आपल्या देशातील असंख्य शहरांची नावे मुसलमान हल्लेखोर किंवा बादशहा यांच्या नावावर आहेत. एवढेच काय, तर राजधानी दिल्ली येथील अनेक मार्गांची नावे मुघल शासनकर्त्यांच्या नावावर आहेत. थायलंडच्या राजधानीतील विमानतळाचे नाव सुवर्णभूमी आहे. आकाराच्या तुलनेत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ आहे. याचे क्षेत्रफळ ५,६३,००० स्क्वेअर मीटर आहे. याच्या स्वागत हॉल च्या आत समुद्र मंथनाचे दृश्य चितारलेले आहे. पौराणिक कथांनुसार देव आणि दानव यांनी मिळून अमृत मिळवण्यासाठी समुद्राचे मंथन केले होते. त्यासाठी दोर म्हणून वासुकी नाग, रवी म्हणून मेरू पर्वत यांचा उपयोग केला होता. नागाच्या फण्याच्या बाजूला असुर आणि शेपटीच्या बाजूला देवता होते. मथानी स्थिर राखण्यासाठी आसवाच्या रुपात विष्णू होते. जो कोणी व्यक्ती या विमानतळाच्या हॉल मध्ये जातो, त्याला समुद्र मंथनाचे रमणीय दर्शन घडते.