जनावरांच्या अवयवांचा उपयोग केला जातो
वुडू या विद्येत मुख्यत्वे करून जनावरांच्या अवयवांचा वापर केला जातो. यामध्ये जनावरांच्या अवयवांनी समस्या समाधानाचा दावा केला जातो. या जादूच्या माध्यमातून पूर्वजांचा आत्मा एखाद्या शरीरात बोलावून देखील आपले काम करून घेता येते. याशिवाय दूर बसलेल्या मनुष्यायचा रोग आणि अडचण यांच्या इलाजासाठी पुतळ्याचा देखील उपयोग केला जातो. वुडू माहिती असलेल्या लोकांची मान्यता आहे की धरतीवर उपस्थित प्रत्येक जीव शक्तीने परिपूर्ण आहे. म्हणूनच त्यांच्या उर्जेचा उपयोग करून आजार बरे केले जाऊ शकतात. वुडू मध्ये माकड, मगर, बकरी, उंट, वानर, पाल, बिबट्या इत्यादी जनावरांचे अवयव वापरले जातात.