संग्रह ७
१२६
आईबापाच्या माघारी घरी हाईती गूळभेल्या
बहिणी दारावरनं गेल्या, न्हाई बंधुनं बोलावल्या
१२७
आईबापाच्या माघारी भाऊ नव्हत बहिणीचं
बहिन इसरती, करती माह्यार मेव्हणीचं
१२८
पिताजीची सर काय करतो चुलता ?
पिकला उंबर गावाच्या खालता
१२९
जाते माह्याराला भावजय करी रागराग
माय ती न्हाई आतां, वेड्या मना फीर मागं
१३०
जाते माह्याराला मन उदास माझं हुतं
बयावाचून घर रितं !
१३१
बयाच्या जीवावरी अंगी केलीया सावकारी
भावजईच्या राज्यांत द्यायाघ्याया झाली चोरी
१३२
आईबापाच्या माघारी सत्ता न्हाई कोनांत
बयाबाईच्या उतरंडी हाईती माझ्या ध्येनांत
१३३
पिताजीची सर काय करतो चुलता ?
पिकला उंबर गावाच्या खालता
१३४
जाते माह्याराला भावजय करी रागराग
माय ती न्हाई आतां, वेड्या मना फीर मागं
१३५
जाते माह्यारला मन उदास माझं हुतं
बयावाचून घर रितं !
१३६
बयाच्या जीवावरी अंगी केलीया सावकारी
भावजईच्या राज्यांत द्यायाघ्याया झाली चोरी
१३७
आईबापाच्या माघारी सत्ता न्हाई कोनांत
बयाबाईच्या उतरंडी हाईती माझ्या ध्येनांत