Get it on Google Play
Download on the App Store

ताणाताण......... मनाची

बापरे.......... कधी काय बातमी समोर येईल काही सांगताच येत नाही.......आज आल्या आल्या टि. व्ही. लावला तर भय्युजी महाराजांच्या आत्महत्येची बातमी ऐकली.........
त्यांना प्रत्यक्ष कधी बघितल नव्हतं.... पण एकुन होते........ कितीतरी राजकारणी लोकांचे आणि अनुयायांचे अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेले, समाजकार्यात अग्रणी एक लोकप्रिय व्यक्तीमत्व........... बातमी बघितल्या बघितल्या पहिला प्रश्न मनात आला... तो म्हणजे असं का केलं असेल बरं.......???? कशाचा एवढा ताण असेल.....??? किंवा कोणता असा प्रश्न असेल ज्याचं उत्तर "जीवनाचा शेवट" हेच असावं......... का माणूस ईतकं टोकाचं पाऊल उचलत असेल....???? . आणि जेंव्हा हे पाऊल उचललं जातं त्या वेळची मनस्थिती किती भयानक असेल....................ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...... मन खुप खिन्न झालं.. ते तर खुप लोकप्रिय व्यक्ती होते.... असो आपण यातुन धडा घेऊन आपल्या बद्दल बोलुया.......

लोकहो सामान्य माणसाचं जगणं सध्या अ$$$$$तिशय कठिण झालेलं आहे.... असंख्य कधिही खरे न होणारे स्वप्न..... फॅमिली मेंबर्सच्या एकमेकांबद्दल च्या सत्य परिस्थीती लक्षात न घेता केलेल्या अपेक्षा... शिक्षणासाठी लागणारा लाखो रुपयांचा अवास्तव खर्च करतानाची कुतरओढ........... एक गोष्ट मिळाली की दुसर्‍या गोष्टींचा हव्यास........ कोणतेही संस्कार न करुन घेणाऱ्या तरुण पिढीला हाताळताना येणारा प्रचंड ताण...... डिलक्स लाईफच्या नावाखाली केली जाणारी चैन.. त्या साठी वाट्टेल त्या मार्गाने पैसे कमावणारे लोकं............ आणि आपलं या अशा जगात भविष्यात कसं होणार......??? या प्रचंड भितीचा ताण माणसाला आला कि मग तो असं काहीतरी टोकाचं करत असावा.......... न आपण रहाणार....... न समस्या.........

किती टोक आहे हे.......... थोडं स्वतःचं जग छोटं करा बघा किती सुंदर आहे सगळं.... तिने हिरा घेतला...... नी त्यानी मर्सिडिझ घेतली..... अरे घेऊ दे ना........... तिचं तीला नि त्याचं त्याला लखलाभ.......... तुझ्या बुद्धीमत्तेचाच अलंकार घाल की........काहीही इथुन नेता येणार नाहीये....... गेल्यावर लवकर स्मशानात पोचवण्याचीच पडते सगळ्यांना......

तु केलेलं कामच फक्त मागे रहाणार आहे...... तुझी ओळख म्हणून............ थोडं आपल्या अपेक्षांचं ओझं कमी करा मिञांनो......पैसा कमावण्यासाठी.........तुमच्या कुटुंबियांना पणाला लावु नका..... घट्ट मिठी मारा तुमच्या छोट्या मुलांना.... आई वडिलांना...तुमच्या साथीदाराला...... बघा कशी पॉझिटीव्ह एनर्जी मिळेल..... जगातला कोणताही ताण असुद्या.... तो घेऊन आईवडिलांन कडे जा......अरे काय घाबरतोस...... मी आहे तुझ्या पाठीशी........ईश्वरावर विश्वास ठेव..... एवढच ते म्हणतात पण त्यातुन दहा हत्तींच बळ देऊन जातात.........
           
सकारात्मक विचार,जे मिळालं आहे त्यात समाधान आणि आनंद मानुन प्रगती कडे वाटचाल करत रहाणे.........अपेक्षांच ओझं कमी करुन साहित्य, कला, छंद जोपासुन....... वेगवेगळ्या महान व्यक्तीमत्वांचे आत्मचरित्र वाचुन.......... वखवखलेल्या आयुष्यात शांतता निर्माण करणे.............. तुम्ही पळताना तुमच्या मुलांचं बालपण, तुमच्या साथीदाराची स्वप्न...... हि देखणी स्टेशनं मागे सोडून पळु नका मिञांनो.. नाहीतर तुम्ही डेस्टिनेशनला तर पोचाल पण तिथे एकटेच असाल.......... असं होता कामा नये........ सगळ्यांना सोबत घेऊन चला..... मंजिल थोडी नजदीक भी हो तो कोई बात नही.... हाथ तो हाथ मे है....
          
खालचे दोन्ही परीच्छेद आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी आहेत मिञांनो.......... श्री श्री रविशंकर म्हणतात तसं..... नफरत और तणाव को मुझे गुरुदक्षिणा मे दे दो...............
खरच देऊन टाकायचं आणि छान सुंदर, तणाव मुक्त जीवन जगायचं.........ताण आला कि रेडिओ लावुन छान मोठ्ठ्या आवाजात गाणे ऐकायचे.............. डोळे गच्च बंद करायचे आणि विहार करुन यायचा...... मस्त गुलाबांच्या बागेत..............
तिकडे देवानंद म्हणतच असतो....

मै जिंदगी का साथ निभावता चला गया...
हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया.....

योगिता कुलकर्णी...