रामचंद्राचीं आरती - काय करुं माय आतां कवणा ओव...
काय करुं माय आतां कवणा ओवाळूं ।
जिकडे पाहे तिकडें राजाराम कृपाळू ॥ धृ. ॥
ओवाळूं गेलिया सद्गुरुरामा ।
क्षमा रूप निजपण न दिसे आम्हां ॥ काय. ॥ १ ॥
सुर नर वान्नर राम केवळ ।
खेचर निशाचर तेही राम केवळ ॥ काय. ॥ २ ॥
त्रैलोकी रामरुप साचार एक ।
सद्गुरुकृपें केशव राज आनंददीप ॥ काय करू माय. ॥ ३ ॥