शंकराची आरती - आरती रत्नेश्वराची । करु य...
आरती रत्नेश्वराची । करु या राऊळनाथाची ॥
धससी धामणसे भुवनी नमिते तवभक्त सदाचरणी ।
पडतां भक्त हाक कानीं । संकटी येता धांवोनी ॥
चाल - उमावृष नाहीं मनीं तेव्हां रुपतव सगुण , सदाकरि चिंतन , अनन्य होऊन ,
आसधरी तुमची , कराया सेवा चरणाची ॥ आ . ॥
रत्नासुर तव भक्ति करी । पूजिती पार्थिव लिंग करी ॥
तोषवि तुजत्या वर देसी । मातला असुर जन त्रासी ॥
चाल - रक्षणा यावें या समया , वधुनि तो असुर जन त्रासी ॥
चाल - रक्षणा यावें या समया , वधुनि तो असुर नाम रत्नेश्वर , स्वयंभू लिंगवर तेणे सकलाची लोपली भीति तव जनांची ॥ आ . ॥
संनिध वाहे सोम गंगा श्रीविष्ठेद् भूतहि वारिधिगा । स्नानार्चन अभिषेकाला । इतर जलीं आवड ना तुजला ॥
कृपेने पाहि पाहि आम्हां । तुजवांचोनी नाहीं आम्हा कुणी ॥
दयार्द्र नयनीं करी कणव अमुची , घाली पाखर मायेची ॥ आ . ॥
ऎसे वर्णू किती देवा । अमितगुण समुह कसा गावा ॥
अमुचा कल्मष नासावा ॥ सतत तव घडो चरण सेवा ॥
चाल - इहपर पुण्य फला देई ॥
ध्यात तव चरण , सदा तुज शरण , अनंतज
अजाण दामोदर विनंती भवदु : ख्न हरायाची ॥ आ . ॥