श्लोक ६ आणि ७
श्रीमहागणपति: उवाच :---
ॐ गणेश्वर गणक्रीड: गणनाथ: गणाधिप: ।
एकदन्त: वक्रतुण्ड: गजवक्त्र: महोदर: ॥६॥
१) गणेश्वर---शिवगणांचा ईश्वर म्हणजे अधिपती. मुद्गल पुराणात सगुणनिर्गुणाच्या अभेदत्वाचे नाव आहे ‘गण’. सगुणात आणि निर्गुणातही ज्याची सत्ता आहे तो ‘गणेश्वर’ होय. आकाशादी पंचमहाभूतांच्या समूहाला ‘गण’ असे म्हणतात. त्यावर सत्ता असणारा तो ‘गणेश्वर’.
२) गणक्रीड---गणेशाचा शिष्य गणक्रीड, गणक्रीडाचा शिष्य विकट, विकटाचा शिष्य विघ्नविनायक हे तीनही गुरू गणेशरूण आहेत. मंत्रारंभी गुरुस्मरण आवश्यक म्हणून गणक्रीडाचे स्मरण अथवा आकाशादी गणात प्रवेश करून त्यांच्यात क्रीडा करणारा.
३) गणनाथ---गणसमूहाचा स्वामी. सगुण-निर्गुणाचा म्हणजेच पर्यायाने दृश्यादृश्य सर्वांचा स्वामी.
४) गणाधिप:---गणांचा अधिप म्हणजे सर्व गणांवर ज्याची अधिसत्ता चालते तो. जगत् जीव आणि ईश्वरांचा समूह ‘गण’ नावाने ओळखला जातो त्या गणांचे आधिपत्य करणारा.
५) एकदंष्ट्र---एकच दात राहणं हे गणपतिच्या युद्धातील पराक्रमाचं द्योतक आहे, किंवा एक म्हणजे माया. मायेवर ज्याची सत्ता चालते तो एकदंष्ट्र.
‘एक’ शब्द मायावाचक असून तिला सत्ता देणारा जो मायिक पुरुष तो दंष्ट्रावाचक किंवा दंतवाचक समजावा. उपलक्षणार्थरीत्या ती एकत्वाने जाणता येते तर तिला आधारभूत असणारा मायिक जो पुरुष तिला सत्ता देण्याच्या निमित्ताने प्रत्ययास येतो. म्हणून तो दंतवाचक ठरतो. अशा, माया स्वरूप प्रकृती आणि मायिक
स्वरूप पुरुष, या दोघांनाही, स्वेच्छेने खेळविणारा तद्रूप अशा सर्वांच्याच बुद्धीमध्ये राहाणारा आणि त्या प्रकृतिपुरुषाहून पलीकडे असलेल्या महिम्याने कळणारा अशा अर्थी ‘एकदंष्ट्र’ नामधारी गणेश.
६) वक्रतुण्ड---वळलेल्या सोंडेचा म्हणून वक्रतुण्ड. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड:’ म्हणजेच दुष्टांचा संहार करतो म्हणून तो वक्रतुण्ड. ज्याचे नराकृति शरीर विश्वरूप म्हणजे मिथ्या मायामय ठरले आहे. त्याहून सर्वथा विरुद्ध विपरीत अतएव वक्र असे जे सत्यरूप ब्रह्म तेच ज्याचे तुण्ड म्हणजे मुखादि-संपन्न शिर ठरलेले आहे, त्या परमात्म्याला ‘वक्रतुण्ड’ म्हणतात. सर्वतोपरी विपरीत अतएव विरुद्धवर्ती म्हणजे वक्रस्वरूप असणार्या मायाभावांचा, समूळ नाश करणारा तो परमात्माच समर्थ आहे म्हणून त्याला ‘वक्रतुण्ड’ म्हणावे. विष्णुने वामनावतार धारण करून बळीच्या यज्ञाचा नाश केला व त्याला पाताळात लोटले. देवराज इन्द्र निश्चिंत झाला. त्या वामनावतारातसुद्धा निष्णूने विदर्भ देशातील अदोषपुरानामक गणेशक्षेत्रामध्ये जाऊन गणेशाची आराधना केली व यज्ञविध्वंसन सामर्थ्य मिळविले. त्याप्रसंगाची साक्ष म्हणून वामनवरद श्रीवक्रतुण्ड म्हणून श्रीगणेश प्रसिद्ध आहे.
७) गजवक्त्र---ज्याचे मुख ह्त्तीचे आहे तो गजवक्त्र. वक्त्र = मुख.
८) महोदर---अनन्तकोटी ब्रह्माण्डे उदरात सामावलेली आहेत. म्हणून ज्याचं उदर मोठं आहे तो महोदर.
लंबोदर: धूम्रवर्ण: विकट: विघ्ननायक: ।
सुमुख: दुर्मुख: बुद्ध: विघ्नराज: गजानन: ॥७॥
९) लंबोदर---ज्याचे पोट ब्रह्माण्डांचे आश्रयस्थान आहे तो. आदिशक्तीने तप करून प्रार्थना केल्यावरून तिच्या ध्यानापासून ‘लंबोदर’ नावाचा श्रीगजाननाने अवतार धारण केला. तोच आदिशक्तीचा पुत्र होय. विश्वब्रह्मादी संपूर्ण दृश्यादृश्य वस्तुमात्र ज्याच्या उदरात समाविष्ट आहे, जो परमश्रेष्ठ असल्याने कोणाच्याच उदरात समाविष्ट नाही. असण्याचा संभव नाही, तो लंबोदर असा अर्थ या नावात समजावा. हे समग्र विश्व अर्थात् नानाविध ब्रह्मस्थितीसुद्धा जणू ज्याच्या उदरापासून निर्माण झाल्या आहेत. त्याच्याच सत्ताबलाने समग्र व्यवहार करतात म्हणून त्या त्याच्या उदरामध्येच राहतात व शेवटी तेथेच लीन होतात. अशाप्रकारे अनंत व अपार अशीच ज्याची उदस्थिती लंब म्हणजे विशाल ठरलेली आहे तो ‘लंबोदर’ होय.
क्रोधासुरनामक दैत्याच्या नाशासाठी लंबोदर गणेशाचा अवतार झाला असल्याचे मौद्गल पुराणाच्या पाचव्या खंडात वर्णिले आहे. श्रीक्षेत्र, गणपतिपुळे. जि. रत्नागिरी हे लंबोदर गणेशाचे क्षेत्र असून पुराणप्रसिद्ध अष्टमहाविनायकांपैकी एक आहे.
१०) धूम्रवर्ण---धुरकट रंगाचा किंवा ज्याचे यथार्थरूप सहज कळत नाही असे परमगूढतत्त्व, कलियुगातील अधर्माचरणाचे प्राबल्य (पाच वर्षांच्या मुलीस मुले होऊ लागणे व सोळा वर्षापर्यंतच आयुष्य असणे, असा प्रकार होईपर्यंत जेव्हा वाढते) तेव्हा त्याला आळा घालण्याचे सामर्थ्य कोणामध्येच नसते, अधर्म फार वाढतो, देव उपोषित होऊन पीडित होतात आणि गणेशाचे आराधन करतात त्यावेळी त्यांना वर देऊन श्रीगणराजप्रभू धूम्रवर्ण नामक अवतार धारण करतात व कलीचा पराभव करून पूर्वीप्रमाणे धर्मस्थापना करतात. असा हा धूम्रवर्ण अवतार कलिकृत दोषांचा नाश करणारा आहे. अधर्माचरणाचे प्राबल्य वाढते तेव्हा कल्कि अवतार होऊन तो कलीचा पराभव करतो पण ते सुद्धा गणेशाचे आराधन करून. जेव्हा त्याहीपेक्षा अतिशय प्रमाणात कलिवृद्धी होते व कल्कीचेही सामर्थ्य कुंठित होते तेव्हा हा धूम्रवर्ण अवतार होतो. धूम्रवर्ण नावाचा संकेतार्थ असा की ज्याप्रमाणे धुरामध्ये गुरफटलेला पदार्थ दिसत नाही त्याप्रमाणे मायेच्या आवरणापलीकडे व मन आणि वाणीनेही अगम्य असा परब्रह्म परमात्मा असा तो प्रभू ‘धूम्रवर्ण !’
११) विकट---दुष्टांच्या पारिपत्यासाठी भयंकर रूप धारण करणारा, कट् धातू आवरणवाचक व वर्षाववाचक असल्याचे व्याकरणशास्त्रात वर्णिले आहे. म्हणून माया-आवरण-रहित म्हणजे ‘विगतकट’ अथवा स्वानंदसुखाचा वर्षाव करणारा म्हणून विशेषत: कट अशा दोन्ही अर्थी गणराजप्रभूचे स्तवन ‘विकट’ नावाने झाले आहे. हा संपूर्ण जगद्विलास मायामय व मिथ्या व अशाश्वत आहे. हे सत्यनित्यस्वरूप ब्रह्माच्या परिज्ञानाने होते. परब्रह्य स्वत: मायारहित, माया-आवरण-नाशक व स्वानंदसुखसंपन्न ठरलेला असून, तशा अर्थी त्याला ‘विकट’ असे वेदांनी स्तविले आहे.
१२) विघ्ननायक---अभक्तांच्या कार्यात विघ्न उत्पन्न करणार्या गणसमूहांचा नायक किंवा विघ्नांवर ज्याचे आधिपत्य आहे असा.
१३) सुमुख---मुख म्हणजे प्रारंभ, ज्याच्यामुळे कार्यारंभ सुंदर व यशस्वी होतो किंवा सुंदर मुख आहे ज्याचे असा तो.
१४) दुर्मुख---मुख म्हणजे ओळख. ज्याची ओळखी किंवा ज्ञान होणे अथवा ज्याला समजून घेणे अतीव कष्टप्रद अर्थात गहन, गूढ आहे असा.
१५) बुद्ध---अविद्यानाशक किंवा पूर्ण ज्ञानी. नित्यबुद्ध.
१६) विघ्नराज---विविध विघ्नांवर ज्याची सत्ता चालते तो. अभिनंदन नावाचा पृथ्वीवरील एक राजा राजधर्माप्रमाणे राज्य करीत असता त्याचे इंद्राबरोबर वैर सुरू झाले. इन्द्राचे देवत्व नाहीसे व्हावे यासाठी इन्द्राचा हविर्भाग न ठेवता त्याने एक यज्ञ सुरू केला. ही हकिकत नारदांकडून इन्द्रास कळली. अखिल विश्वचालक जो भगवान् कालपुरुष याचे यथाविधि आवाहन, स्तवन करून ‘राजाच्या यज्ञाचा नाश करावा’ अशी प्रार्थना इंद्राने केली. वरदानबद्ध कालपुरुषाने राजाच्या यज्ञाचा नाश केला ‘इंद्राहुतीवाचून यज्ञ करणे हे राजाचे कृत्य शासनयोग्य खरे पण तो शासनाधिकार इंद्राचा नव्हे, जगन्नियंत्याचा आहे हे ध्यानात न घेता इंद्राने अहंकाराच्या व क्रोधाच्या भरी पडून विश्वक्षोभकारक कालाच्या साहाय्याने आपण स्वत:च शासन करण्याचे मनात आणले. अर्थात् विश्वनियंत्याच्या अधिकाराचे हे अतिक्रमण इंद्राच्या व विश्वाच्याही नाशास कारणीभूत ठरले. अशा प्रकारे असत्रूपाने प्रवृत्त झालेला तो काल म्हणजेच विघ्नासुर. त्याने नाना प्रकारच्या माया योजून सर्वांनाच कर्मभ्रष्ट केले. तेव्हा धर्मशासनाधिकारी वसिष्ठ वगैरे मुनी ब्रह्मदेवांना शरण गेले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, पार्श्वमुनींनी तप केल्यावरून श्री ब्रह्मणस्पती गणेश सांप्रत त्याचा पुत्र झाला आहे. तोच या विघ्नासुराचा नाश करण्यास समर्थ आहे. त्यालाच शरण जा. त्यानंतर सर्व मंडळी पार्श्वांच्या घरी आली त्यांनी विघ्नासुराचा नाश करण्याविषयी श्रीगणराजप्रभूंची प्रार्थना केली. त्याच्या उन्मत्त प्रवृत्तीचा नाश करून त्याला गणराजप्रभूंनी आपल्या स्वाधीन ठेवले. ‘माझ्या नावाने युक्त असे नाव आपण धारण करावे.’ अशी प्रार्थना विघ्नासुराने केल्यावरून ‘विघ्नराज-विघ्नेश्वर’ या नावाने गणेशांची विशेष प्रसिद्धी झाली. स्वत:चे विश्वनियामकत्व कार्य करण्यासाठीही आज्ञाधारक सेवक म्हणून त्या कार्यावर त्या विघ्नरूपाची स्थापना केली. ज्या सत्कर्मामध्ये आधी गणेशपूजा किंवा स्मरण होणार नाही त्या सत्कर्मामध्ये आसुरभावाने तेथील सर्व फळ भोगण्याचा अधिकार विघ्नराजाने विघ्नासुराला देऊ केला. ‘विघ्नराज’ हे नाव सुद्धा केवळ सत्तार्थ संकेत-बोधकच समजावे. विघ्न शब्दाचा अर्थ प्रतिबंधसत्ता असा असून समग्र सत्तावानांची सत्ता कुंठित करून टाकण्याचे सामर्थ्य म्हणून ती विघ्न संज्ञा अन्वर्थक समजावी. त्या विघ्नाचा राजा अर्थात् तसे अकुंठित सामर्थ्य धारण करणारा आणि इतर सर्वांचीच सत्ता कुंठित करून टाकणारा असाच तो विघ्नराज जाणावा. त्याची सत्ता मात्र सर्वदा सर्वत्र अकुंठित ठरली आहे. त्याच्या सत्तेला केव्हाही, कोठेही, कसलाही प्रतिबंध कोणीच करू शकत नाही. विघ्नराजनामधारी श्रीगणराजप्रभू शास्त्रोक्तमार्गाने भजन करणार्या आपल्या भक्तांना भुक्ती व मुक्ती देतो. त्यांची सर्व प्रकारची विघ्ने हरण करतो. त्याच्या अभक्तांना नाना प्रकारची विघ्ने देत असतो. विष्णु-शिवादी परमेश्वरांच्या भक्तांनाही आपल्या उपास्य देवतांच्या भक्तीपुर्वी गणेशाराधन अवश्य करावे लागते तसे गणेशभक्तांना दुसर्या देवांचे आराधन करावे लागत नाही. तोच एकमात्र संपूर्ण अर्थाने भुक्तिमुक्तिप्रदाता ‘विघ्नराज’ होय.
देवांनी प्रतिष्ठापना केलेले असे हे विघ्नराज क्षेत्र विजयपुरी येथे निर्माण झाले. आंध्रमधील ही नगरी आता अस्तित्वात नाही. त्याचे अद्यापि संशोधन झालेले नाही.
१७) गजानन---ज्याचे मुख हत्तीचे आहे असा तो. गजमस्तकधारी. ‘गज’ म्हणजे निर्गुणस्वरूप ओंकार. हे ज्याचे मस्तक तो ‘गजानन’ होय. गजासुर नावाचा दैत्य उत्पन्न झाला. त्याने विष्णुशिवादी सर्वांनाच जिंकून धरून आणले व सांगितले की ‘दोन्ही हातांनी दोन्ही कान धरून, भूमीवर मस्तक टेकवून नमस्कार करणे, असा विशेष नमस्कार माझ्या पायांजवळ दररोज करीत जा.’ हेतू हा की अशा कृतीने हे सर्वेश्वर देव पूर्णपणे नम्र होऊन यांचे श्रेष्ठपण पूर्ण नष्ट होईल. पण विष्णु आदी देवांना हा नमस्कार सत्त्वहानिकारक व अपमानास्पद वाटला. त्याचवेळी पराशरपुत्र गजाननावतार झाला.
गणेशाचे स्वरूप गजाननाकृति वर्णिले आहे. म्हणजे त्याचे गळ्याखालचे शरीर नररूप असून मस्तकाचा भाग गजाकृति ठरलेला आहे यामधील तात्पर्यार्थ असा की लयोत्पत्तियुक्त असणारा सगुण विलास म्हणजेच समग्र जगत् प्रपंच हाच ज्याचा देह असून, ज्याचे मस्तक निर्गुण ब्रह्मत्व दर्शविणारे आहे अर्थात् सगुण-निर्गुणादि भावांहून व त्यांहून सर्वथा रहित, पलीकडे असणारा परमात्मा तो ‘गजानन’ होय. असेच विज्ञानसिद्ध पुरुष म्हणतात.