धम्मचक्र मुद्रा
या मुद्रेला "धम्म चक्र ज्ञान" (Teaching of the wheel of the Dhamma) याचे संकेत देणारे चिन्ह म्हणूनही ओळखले जाते. हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.