अभगिनी व तिची लहान मुलगी 9
लिलीला घेऊन तिची आई झाडाखाली बसली. आईच्या मांडीवर लिली होती. हसत होती. आकाशातील चांदोबाकडे झाडाच्या पानांतून ती पाहात होती. थोडया वेळाने खाणावळीतून बोलावणे आले. लिलीला घेऊन तिची आई गेली.
'ऐकलं तुमचं म्हणणं. परंतु 7 रुपये हवेत. पुढच्या वर्षी 8, मग तिसऱ्या वर्षी 10 चौथ्या वर्षी कळवीन. अहो, अनेक खर्च असतात. आजारीच पडली, काढाच ठेवा, सुंठ आणा, - एक का दोन, मुलांची शेकडो दुखणी. गोवर आहे, कांजिण्या आहेत, देवी आहेत. नाना प्रकार. पाच रुपयांत कसं व्हायचं? थंडीत गरम कापड हवं, उन्हाळयात मलमल हवी. हो, सारं नीट नको का करायला? आणि सहा महिन्याचे पैसे आज आगाऊ आधी मुलीला ठेवताना. कारण तुम्हाला नोकरी कधी मिळेल त्याचा काय नेम? हल्ली सर्वत्र बेकारी. पाहा परवडत असेल तर. मी ठेवायला तयार आहे. सारं मनापासून करीन. तशी आमची ही प्रेमळ आहे. ठरवा तुमच्या मनात.' खाणावळवाला म्हणाला.