एँम्बर रेने हॅगरमॅन
एँम्बर रेने हॅगरमॅन ह्या नऊ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन मग खुन करण्यात आला होता. एँम्बर आपल्या आजी-आजोबंच्या घरी सुट्टीसाठी गेली होती. ती त्यांच्या अंगणात आपली सायकल चालवत होती. जानेवारी १३,१९९६ साली तिला तिथुन पळवण्यात आलं होतं. एँम्बर आणि तिचा भाऊ रिकी आपली सायकल चालवत चालवत नेहमीपेक्षा जरा जास्त लांब गेले होते. तिथेच जवळ एक ओसाड किराणमालाचे दुकान होते बरेच वर्षे तिथे कुणी फिरकले नसावे. त्या दुकानाच्या पार्किंग लॉटच्या उतारावर लहान मुले नेहमी खेळत असत. एँम्बर आणि रिकी कधी ईतक्या लांब नव्हते आले. त्या किराणमालाच्या दुकानाजवळ जायचे नाही असे त्यांच्या आईने बजावले होते. त्यामुळे रिकिने एँम्बरला "आपण परतुया" असे सांगुनही तिने ऐकले नाही. रिकी तिथुन परतु लागला आणि तरीही एँम्बर त्या रँम्पवर एक फेरी मारण्यासाठी थांबली. रिकी घरी पोहोचला. घरातल्यांनी एँम्बरबद्दल विचारणा केली. ती मागुन येईल असे सांगुन रिकिने आपली सायकल गॅरेजमध्ये लावली. तेंव्हा त्याच्या आईने त्याला एँम्बरला घरी घेऊन येण्यास सांगितले. रिकी त्या ओसाड दुकानाच्या पार्किंग लॉटमध्ये गेला. त्याला एँम्बर कुठेच दिसली नाही. त्याने घरी येऊन सांगितले. त्याचे आजोब जिमी व्हीटसन पटकन आपल्या गाडीत बसले आणि स्वतः एँम्बरला शोधायला बाहेर पडले. त्यांना त्या ओसाड दुकानाजवळ पोलिसांची एक गाडी पाहिली. ते खाली उतरले. त्यांनी पोलिसांना आपली ओळख सांगितली. त्यांनी माहिती विचारता पोलिसांनी तेथे फक्त एक सायकल मिळाल्याचे सांगितले. पोलिसांना खबर तिथेच जवळ राहणार्या एका माणसाने दिली होती. त्याने मुलीचे किंचाळणे ऐकले आणि एका माणसाला तिला घेऊन जाताना पाहिले तसे लगेचच पोलिसांना खबर दिली असा जबाब दिला होता.
त्या हकिकतीनंतर एँम्बरच्या घरचे वरचेवर टि.व्हीवर येउन तिच्या सुखरुपतेची आणि तिला जिवंत घरी परत पाठवण्याची मागणी करत होते. हे वेगळेच विचित्र अपहरण होते असा अंदाज पोलिसांनी लावला होता. ज्या माणसाने पोलिसांना फोन केला होता त्याव्यतिरिक्त कुणीही तिला किंवा अपहरणकर्त्याला पाहिले नव्हते. या दुःखद घटनेनंतर अवध्या चारच दिवसांनी एँम्बरचे नग्न शव एका बिल्डिंगला लागुन असलेल्या खाडीजवळ सापडले. तिच्या गळ्यावरुन धारदार शस्त्राने वार केला होता. पुराव्यां अभावी पोलिसांना एँम्बरचा खुनी सापडला नाही. परंतु एँम्बर प्रकरणामुळे आज "एँम्बर अलर्ट सिसटम" सुरु करण्यात आली आहे.