Get it on Google Play
Download on the App Store

बेट्सी अॅरडस्मा

बेट्सी ऍरडस्मा ही बावीस वर्षीय ब्रिटीश मुलगी होती. ती मिशीगनची होती. ती पेन्सलवेनीया स्टेट युनिवर्सिटीमध्ये शिकत होती. २८ नोव्हेंबर १९६९ या दिवशी बेट्सी आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये गेली होती. ती आपल्या प्रबंधाच्या पेपरसाठी काही पुस्तकं चाळत होती आणि काही साहित्य गोळा करत होती. तेवढ्यात तिच्या हृदयातुन एक सुरा आरपार झाला. ती होती त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्या पोस्टमॉर्टेममध्ये तिचा मृत्यु सायं.४.४५ ते सायं ४.५५ यावेळेत झाला असे स्पष्ट झाले. तिच्यावर सुर्‍याचा वार झाल्यावर दुसर्‍याच क्षणाला ती लायब्ररीच्या जमिनीवर कोसळली. तीचे शरीर जिथे पडले होते त्या भागातुन दोन इसम लायब्रेरियनकडे "त्या मुलीला वाचवा" असं म्हणत पळत आले. ते दोघं नंतर झालेल्या गदारोळात लायब्ररीमधुन निघुन गेले असावे हा अंदाज पोलीसांनी लावला होता.

या घटनेनंतर त्या दोघांना कॉलेजच्या वा लायब्ररीच्या आवारात कधीही कुणी पाहिले नाही कि त्यांची ओळख पटवली नाही.  बेट्सीवर प्रथमोपचार म्हणुन तोंडांने श्वास देण्यात आला. तिला साधारणपणे सव्वा पाच वाजता कँम्पसमधल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिला तिथे नेईपर्यंत उशीर झाला होता. तिच्या खुनाच्यावेळी तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. त्यामुळे घाव कितपत मोठा आहे हे कुणालाच कळले नाही. एका वारात तिच्या हृदयापर्यंत सुरा खुपसला गेला होता. ही माहितीपण तिचं शवविच्छेदन केल्यानंतर कळली. सिपिआर देणार्‍यांनी तिला आकडी आली आणि त्यामुळे कदाचित तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. ज्यावेळी तिला हॉस्पिटलला आणले होते तेंव्हा तिचा घाव दिसत नव्हता. गेल्या अठ्ठेचाळीस वर्षात बेट्सीची केस सोडवली गेली नाही. अजुनही पेन्सलवेनियाचे पोलिस बेट्सीच्या खुन्याला शोधत आहेत.