Get it on Google Play
Download on the App Store

अँड्र्यु आणि ऍबी बोरडन

अँड्र्यु आणि ऍबी बोरडन यांच्या केसमध्ये त्यांचापेक्षा त्यांचा खुनीच जास्त प्रकाशझोतात आला आणि प्रसिद्ध झाला. यांच्या खुनाचा आळ त्यांची मुलगी लिझी बोरडन हिच्यावर होता. ४ ऑगस्ट १८९२ साली अँड्र्यु आणि ऍबी बोरडन यांचा क्रुर खुन यांच्यांच घरात झाला होता. त्यांच्या खुनाच्या दिवशी अँड्र्यु आपल्या ऑफिसला गेला होता. तेंव्हा घरात लिझी आपल्या दायी बरोबर होती. तो घरी आला. त्याने आपली बॅग नेहमीच्या ठिकाणी ठेवली. हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर तो जरा आडवा झाला. त्याला माहिती नव्हते की आत्ता झोपलेला अँड्र्यु कधीही उठणार नव्हता. वामकुक्षी घेणारा अँड्र्यु चिरनिद्रेत गेला. या सगळ्या प्रकाराची शहानिशा करताना पोलिसांनी लिझीचा जबाब घेतला. तिने सांगितल्याप्रमाणे ती जेव्हा हॉलमध्ये आली तेव्हा तिला अँड्र्यु सोफ्यावर मृत अवस्थेत आढळला. अँड्र्युच्या डोक्यात कुण्या बोथट अवजाराने जोरात वार केल्यासारखे घाव होते. घराच्या वरच्या खोलीत लिझीची सावत्र आई ऍबी अश्याच बोथट अवजाराने पण अँड्र्युपेक्षा भयानक पद्धतीने मारली गेली होती. नंतर पोस्टमॉर्टेममध्ये ऍबीची हत्या ही अँड्र्युच्या हत्येच्या एकच तास आधी झाल्याचे दिसुन आले.

हा फोटो लिझी बोर्डनचा आहे.

  त्या डबल मर्डरच्या शंकेची सुई लिझीच्या दिशेने वळली. पोलिसांना ३ ऑगस्ट रोजी लिझीने विष खरेदी केल्याचा अहवाल मिळाला. शिवाय लिझीचा एक ड्रेस त्यांच्या घराच्या किचनमधील स्टोव्हवर जळलेल्या अवस्थेत सापडला. याप्रकारामध्ये फक्त लिझी एकटीच नव्हे तर तिची दाई ब्रिगेट सलीवान ही सामिल होती. लिझी आणि तिची दायी ब्रिगेट मध्ये अनैतिक संबंध असल्याची चर्चाही झाली होती. लिझीचा कुठलासा काका कि मामा पण यात सामिल असण्याचा अंदाज पोलिसांनी बांधला होता.

लिझीला अटकही झाली असती आणि तिला शिक्षाही मिळाली असती पण पुराव्यांच्या अभावी तिची जुन १८९३ ला निर्दोष मुक्तता झाली. सरकारने जरी लिझीची निर्दोष मुक्तता केली असली तरी तिला मॅसाचुसेटस् मधील फॉल रिव्हर रहिवाश्यांनी बहिषकृत केले होते. लिझीने १९२७ साली आपल्या त्याच घरात शेवटचा श्वास घेतला.