आनंद..!!
देवाची पूजा करायला काढलेल्या फुलात कण्हेर जास्वंद तगर आणि एकच सोनचाफा देवघर दरवळून टाकणारा...
सहज म्हणून कण्हेरीचं फूल हातात घेतलं तर त्यालाही सोनचाफ्याचा वास!!
पण म्हणून सोनचाफ्याचा वास काही कमी नाही झाला ..ज्याच्यांशी बोलल्याने तुम्हांला आनंद होतो त्यांच्याशी तर बोलाच पण तुमच्या शी बोलल्याने ज्याला आनंद होतो त्याच्यांशी अधिक बोला....कारण
आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या नसतात भरभरुन आनंद वाटण्याचं दान त्यांना लाभलेलं असतं...आनंद अनुभुति पण सुख म्हणजे आनंद नव्हे सुख हे भौतिक गोष्टी कडे झुकत आनंद देते तर निखळ आनंद समाधान... कृतार्थता!! म्हणून
कधी कधी सगळी सुख असूनही आनंद मिळेलच असे नाही..!!
दृष्टिकोन आनंदाची तीव्रता कमीअधिक करतात इतकेच..!!
©मधुरा धायगुडे