तिथींचे महालय स्मरण
तिथी हे हिंदू कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. अमावास्यान्त पद्धतीप्रमाणे शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय. अशा या दोन पक्षांचा (पंधरवड्यांचा) एक मास (महिना) होतो. शुक्लपक्षाला शुद्धपक्ष आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असेही म्हणतात.
१प्रतिपदा, २.द्वितीया, ३.तृतीया, ४.चतुर्थी, ५.पंचमी, ६.षष्ठी, ७.सप्तमी, ८.अष्टमी, ९.नवमी, १०.दशमी, ११.एकादशी, १२.द्वादशी, १३.त्रयोदशी, १४.चतुर्दशी, १५.पौर्णिमा, १६.अमावस्या.
यामधे
नंदा तिथी = प्रतिपदा, षष्टी आणि एकादशी
भद्रा तिथी = द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी
जया तिथी = तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी
रिक्ता तिथी = चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी
पूर्णा तिथी = पंचमी, दशमी, पौर्णिमा आणि अमावस्या
त्यांचे वार ...
नंदा तिथी - शुक्रवार
भद्रा तिथी - बुधवार
जया तिथी - मंगळवार
रिक्ता तिथी - शनिवार
पूर्णा तिथी - गुरुवार
मग अशा या तिथीचे विवेचन जन्म व मृत्यू ची कालगणना म्हणून ओळख ..महालयात याचा प्रामुख्याने आठवण .याचाच आधार घेवून काही पुण्यकर्मे जयंती श्राद्ध याचे अवलोकन आपणास होते ...अशाच पूर्वजांचे पुण्यस्मरण करणारा हा पंधरवडा पितृपंधरवडा ...
त्यात केला जाणारा श्राद्ध विधी.महालय...
श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. पितृ पंधरवड्यात यमलोकातून पितर म्हणजेच मृत पूर्वज कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी समजूत आहे. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी करायचे असतात.
कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण-पूजन महालय श्राद्धात पिंडरूपाने केले जातेच...
पण शास्त्रीय आधार घेत आपल्या श्रद्धा जपत गरजूंना मदत ,मूकप्राणी पक्षी यांना दाणा -पाणी देवून अगदी त्याच्या स्मरणार्थ एखादे रोपटे लावून त्याचे संवर्धन करुन ही हे पुण्यकर्म करु शकतो ..सध्याच्या या काळात गरजूंना मदत योद्धा बनून आपतकालीन परिस्थीतित आणि एकमेकांविषयी आदर बाळगून कुणाला न दुखावणं हा शिरस्ता कायम ठेवून या महायज्ञात खरी आहुती देता येईल हाच खरा महालयाचा महायज्ञ ठरेल ...शास्त्र श्रद्धा परंपरा प्रथांचे खरे प्रकटीकरण विधीपूर्वक श्राद्ध करताना असेही ह्याद्वारे ही केले तर ....सहजच विचार आला तो मांडला ...तिथीचे महत्व प्रकार या महालयाकाळात सर्वपरिचित आहेच ...एक सहभाग सेवा म्हणून पोहचवायचा माझा एक प्रयत्न ....व्यक्ती सापेक्षता आहेच ......!!
©मधुरा धायगुडे