Get it on Google Play
Download on the App Store

हिंदू धर्माशी संबंध

महाभारताचा हिंदू धर्माशी सखोल संबंध आहे आणि आधुनिक हिंदूंवर आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरेवर त्याचा प्रचंड प्रभाव आहे.  भारतातील बरेच लोक महाभारताला वास्तविक घटित घटनांची एक मालिका समजतात. काही भारतीय या अगम्य महाकाव्यातून घडलेल्या घटनांची इतिहासात नोंद केली आहे. हे महाकाव्य एक ऐतिहासिक लेख समजले जाते. महाभारत हे सत्य आहे की दंतकथा हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे.

आपण याची पाळेमुळे खोदुन काढण्याचा, शोधण्याचा प्रयत्न केला की जाणवते की महाभारत प्राचीन भारतीय इतिहासाला लाभलेली समृद्ध आणि वास्तवदर्शी माहिती आहे. महाभारताच्या सत्यता आणि दंतकथा असण्यावर लिहिलेले लेख वाचल्यास प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे अश्या अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येतील. त्या घटनांचा अभ्यास करत असताना आपल्याला बहुधा मतांची एक बाजू मिळेल अशीही समजेल ज्यालेखी महाभारतातील वास्तव ही वस्तुस्थिती नाही. या चर्चेअंती इतके तर सत्य आपल्याला कळेल की महाभारत हा भारताचा एक समृद्ध आणि ज्ञानाने ओतप्रोत भरलेला भारतीय इतिहास आहे यात शंका नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे महाभारताच्या घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत हे दाखवण्यासाठी बहुतेक मैलाचे दगड देखील समोर येतात. या अभ्यासात किंवा पुरावे जमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने काही मान्यता प्राप्त वेबसाइट ही समाविष्ट आहेत. 

काही वेबसाइटसचा असा दावा आहे की त्यांच्याकडे महाभारतातील घटनांचा आणि त्याच्या ऐतिहासिकतेचा खरा पुरावा आहे. ते असे ही म्हणतात की या यादीमध्ये काही ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव आहे आणि ते पुरावे नि:पक्षपाती नाहीत.

दुसरीकडे, वैज्ञानिक दृष्टिने विचार करणारे काही संशयी लोकांनी याला इतिहासाच्या रूपात नाकारले आणि एक पौराणिक कथा म्हटले. परंतु पौराणिक कथांचा आधुनिक हिंदू समाजात इतका गहन प्रभाव का आणि कसा पडला या वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष दिले नसावे.

आश्चर्याची बाब अशी की, आजपर्यंत उपलब्ध झालेल्या पुरातत्व आणि वैज्ञानिक पुरावांवर लक्ष केंद्रित केले. शिवाय त्यावर आधारित भारतीय इतिहासाच्या पुराव्यांचा शोध घेतला तर महाभारत भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे हे स्पष्ट होईल.

तथापि, विचार यावर युक्तिवाद करणार्‍यांनी पुराव्यांच्या दोन्ही बाजूंचा सारासार विचार केला पाहिजे आणि आधुनिक वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित दृष्टिकोनाची कसोटी कुठे लागते आहे हे पाहण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या प्रत्येक भागाची तपासणी केली पाहिजे. या पुस्तकात काही घटनांवर व भारताती वास्तुंवर प्रकाश टाकला आहे ज्यामुळे या चर्चेला एक दिशा मिळेल.

काही प्रश्न एक वाचक आणि लेखक म्हणुन माझ्या मनात घर करुन जातात. इतक्या विविध संस्कृतींची एकत्रित स्मृती चुकीची कशी असूशकते का???  पौराणिक कथेवर सहसा एक किंवा दोन संस्कृतींचा विश्वास असतो. महाभारताच्या बाबतीत हे आकडे फार मोठे आहेत. या महाकाव्याने अखंड हिंदु संस्कृतीला सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या एक विचार प्रवाह दिला आहे.

मग सत्य नेमके काय आहे?  महाभारत एक मिथक आहे की वास्तविकता?  इतिहासाचे समर्थक आणि पौराणिक कथांचे समर्थन करणारे युक्तिवादाचे सर्व पैलू एकदा पडताळुन पाहिले गेले हवेत.

स्पष्टपणे विचारांची बांधाबांध करायची तर, महाभारत केवळ हिंदूंसाठीचेच एक महाकाव्य नाही.  शीख, जैन आणि बौद्ध धर्म यासारख्या इतर धर्मातही महाभारताशी विविध संबंध जोडले गेले आहेत. या धर्मातील विचारसंहिता आणि संस्कृतीचा महाभारत एक अविभाज्य घटक आहे.

थोडक्यात, भारतीय संस्कृती आणि परंपरेशीची ज्यांची मूळं जोडलेली आहेत त्या संस्कृतींना महाभारताची जोड आहे. हे सारे महाकाव्याच्या काही भागांद्वारे अशा विविध समाजांच्या सामूहिक स्मरणशक्तीवर काहीसा प्रभाव पाडण्यासाठी उपयुक्त ठरले आहे असा ठाम युक्तिवाद आहे.