Get it on Google Play
Download on the App Store

भगवतगीतेचे महत्त्व

भगवत गीता हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचे पवित्र पुस्तक आहे, हे महाभारताचाच एक भाग आहे. भगवान कृष्ण यांनी अर्जुनला कुरुक्षेत्राच्यावेळी नैतिक कर्तव्याची पूर्तता करण्यासाठीचे धडे दिले होते त्याचे इत्यंभूत वर्णन त्यात दिले आहे.

ज्यावेळी ऐन कुरुक्षेत्राच्या वेळी अर्जुनाच्या मनात शंकांचं काहुर ऊठलं होतं तेव्हा युद्धामध्ये लढा देण्यासाठी कृष्णाने अर्जुनाला धीर दिला आहे. यामध्ये केवळ अर्जुनाला नव्हे तर समस्त मनुष्यजातीला प्रबोधनात्मक सांगितले आहे. त्यामुळे हा प्रश्न नेहमीच पुढे उभा रहतो की जर महाभारत वास्तविक नाही तर गीता कोणी लिहिली आणि काय हेतू होता?

महाभारत हे महाकाव्य खरे आहे. त्याची सत्यता सूचित करणारे उपलब्ध पुरावे कोणते आहेत?? त्यांचे पहिले विश्लेषण करून मी काही प्रश्नांची उकल होते का हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारत हा खराखुरा इतिहास आहे असा दावा करण्यासाठी काही युक्तिवाद करु इच्छितो.

भारतीयांनी हे कबूल केले पाहिजे की भारतीय पुराणामधील घटनांचे दुवे केवळ विश्वास-आधारित युक्तिवाद नव्हे तर एक शास्त्रशुद्ध तर्काने ठरवले जातात.