श्रेष्ठ कोण ?
एकदा एक विरक्त महात्मा जंगलात बसून परमेश्वराची पूजा करत होते. तेवढ्यात एक कुत्रा तिथे आला आणि त्यांच्या शेजारी बसला.
थोड्या वेळाने काही तरुण तेथून जात होते , त्यापैकी एकाने त्यांना माला उपरोधिकपणे विचारले , "बाबा, तुम्ही गावात फिरता आणि भिक्षा मागून जेवता आणि कामधंदा करीत नाही, याउलट तुमच्या शेजारी बसलेला प्राणी लोकांच्या अन्नावर जगतो पण त्या बदल्यात त्या गावाचे रक्षण करतो. आता तुम्हीच सांगा सर्वोत्तम कोण आहे?"
त्या तरुणाचे म्हणणे ऐकल्यानंतर महात्मा हसले आणि म्हणाले, "वत्स, जर मी नेहमी देवाची उपासना करण्यासाठी तसेच गरीब आणि दलित लोकांची सेवा करण्यास तत्पर असेन तर मी या प्राण्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि जर मी फक्त माझ्यासाठीच जगलो तर जीवन फक्त स्वत:च्या सुख आणि आनंदासाठी खर्च केले. आणि गरीब आणि दलित लोकांच्या सेवेपासून दूर राहिलो तर मग हा प्राणी नक्कीच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”
महात्माजींच्या या नम्र आणि स्पष्ट उत्तराने तरुणांना आपल्या कृत्याची लाज वाटली , त्यांनी भविष्यात विचार न करता कोणत्याही सज्जनावर उपरोधिक टीका न करण्याचा संकल्प केला.