Get it on Google Play
Download on the App Store

चार दिवसांचे जग

संत बहलोल ज्या राज्यात राहत असत त्या राज्याचा बादशहा अत्यंत लोभी आणि जुलमी होता.

एकदा अतिवृष्टीमुळे दफन भूमीमाधिक माती वाहून गेली. तेथील कबरी उघड्या पडल्या. त्यामध्ये हाडे वगैरे दिसू लागली.

संत बहलोल तिथे बसले आणि त्यांनी काही हाडे समोर ठेवली आणि त्यामध्ये काहीतरी शोधू लागले. नेमकी त्याचवेळी बादशहाची स्वारी तिथे आली.

बादशहाने संत बहलोल यांना विचारले, "तुम्ही या मढ्याच्या हाडांमध्ये काय शोधत आहात?"

संत बहलोल म्हणाले, "हुजूर, माझे आणि तुमचे पूर्वज हे जग सोडून गेले. मी शोधत आहे की माझ्या वडिलांची कवटी कोणती आहे आणि आपल्या अब्बा हुजूर यांची कवटी कोणती?"

हे ऐकून बादशहा हसला आणि म्हणाला, "तुम्ही काय मूर्ख माणसांसारखे बोलत आहात? मूडद्यांच्या कवटींमध्ये काही फरक असतो का ज्यामुळे तुम्ही त्यांना ओळखाल."

संत बहलोल म्हणाले, "मग मोठी माणसे गर्व बाळगून चार दिवसांच्या खोट्या जगाच्या झगमगाटामध्ये गरीबांना कमी का लेखतात?"

संत बहलोल यांचे हे शब्द बादशहाच्या हृदयावर बाणाप्रमाणे आघात करून गेले.

संत बहलोल यांचे बादशहाने आभार मानले , त्या दिवसापासून बादशहाने अत्याचार करणे बंद केले.