श्री मोदकेश्वर, नाशिक.
नाशिक शहरात रती मदनाने स्थापन केलेला हा गजानन आहे.
नाशिक शहरातील हिंगण्याच्या गणपती म्हणूनही हे मंदिर प्रसिद्ध आहे.
नाशिक शहरातील नावदरवाजा येथे हे मंदिर आहे
पूर्वी गोदावरी पार करण्यासाठी नावा किंवा बोटी जिथे लागत होत्या तो दरवाजा म्हणून याला नाव दरवाजा असे म्हणतात.
हे गणेशस्थान मोदकाच्या आकाराचे आहे.
या मंदिरात तीन-साडेतीन फुटाची बालमूर्ती आहे.
ही मूर्ती दोन बेटांवर आपले दोन्ही पाय ठेवून उभी आहे.
या ठिकाणी पाषाणामध्ये मोदक सापडतात असे समजले जाते.