Get it on Google Play
Download on the App Store

अवास्तव उत्साहाचे संकट

त्यावेळेस मी माझ्या घरा शेजारीच्या मुलीच्या प्रेमात पडू लागलो होतो. सगळ्यांचा डोळा चुकवून आम्ही गुपचूप भेटायचो. आमच्या चाळीची गच्ची हे आम्हा दोघांच्या भेटीचे ठिकाण  फिक्स होते. एके रात्री ती आणि मी टेरेसवर बोलत झोपलो. मग ती माझ्या कानात म्हणाली,

" हळू आवाजात बोल, चंद्र आपले बोलणे शब्द गुपचूप ऐकत आहे."

मग मी चेकाळलो आणि जोरात बोलू लागलो

"मला या चंद्राची भीती वाटत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, मी हे सर्व जगाला सांगेन".

आणि पुढेही मी ओरडून बोलू लागलो. ती मला गप्प करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तितक्यात माझ्या किंकाळ्या ऐकून झोपलेले तिचे वडील जागे झाले आणि मला मारण्यासाठी गच्चीत धावत आले.

माझी प्रेमकहाणी सुरू होण्यापूर्वीच संपली....