रडणारे ढग
ती विनाकारण माझ्यापासून दूर गेली. तिच्या आठवणींनी मी उदास झालो आणि आता थिजलो तिला पाऊस खूप आवडायचा. तिच्यासोबत पावसात भिजण्याची आठवण मात्र आणि मला सर्दी होते कि काय असे वाटून गेले. मी रडत बसलो होतो. माझे अश्रू पाहून ढगांना सुद्धा रडू कोसळले. माझ्या रुदनाने आलेल्या ढगांच्या अश्रूंना पाऊस समजून ती आता त्यात आनंदाने नाचते आहे. काय करणार? ती जरा क्रूर आहे...