वरुणराजाने केलेली फसवणूक
समुद्रराजाचे समुद्रराणीवर खूप प्रेम होते. त्याने तिच्याशी लग्न करण्याची सर्व तयारी केली होती. पण समुद्रराणीचे समुद्रराजा वर तितकेसे प्रेम नव्हते. हे रहस्य कसे काय कोण जाणे पण वरूणराजाला कळले. वरुणराजाने समुद्रराणीचे मन विचलित केले आणि तिच्याबरोबर पळत ढगांमध्ये अदृश्य झाला. त्या दिवसापासून समुद्रराणीच्या आठवणीत समुद्राच्या गर्जना करणाऱ्या लाटांवर समुद्रराजा वेड्यासारखा भटकत असतो. त्याच्या भीतीमुळे समुद्रराणी स्वाती नक्षत्रात पावसाच्या रूपात येते आणि सागर राजाचे चुंबन घेऊन परत जाते