Get it on Google Play
Download on the App Store

आर्यपुत्र

ताराने बालीला " आर्य पुत्र" संबोधले

समीक्ष्य व्यथिता भूमौ सश्भ्रान्तानिपपातह ।

सप्त्वेव पुनरुत्थाय आयं पुत्रेति वादिनी ॥२८॥

(वाल्मिकि रामायण किष्किन्धा काण्ड सर्ग १९)

आपल्या पतीचा वालीचा मृत्यू पाहून तारा अतिशय दुःखी झाली आणि मूर्च्छित होऊन पृथ्वीवर पडली. काही काळानंतर जेव्हा ती सचेतन बनली, तेव्हा ती वालीला 'आर्यपुत्र' म्हणत रडायला लागली. यावरून हे स्पष्ट होते की वानर हे आर्य वंशाचे मानव होते, प्राणी नव्हते.

वानर जाती आजही अस्तित्वात आहे. जंगलात राहणाऱ्या लोकांना वानर म्हणत. राजस्थानच्या बारमेर भागात वानर जातीचे क्षत्रिय आजही राहतात, मध्य प्रदेशच्या रांचीच्या आसपास ओराव आणि मुंडा नावाच्या दोन जाती आहेत, ज्यांच्या जमाती वानर आणि भुलूक आहेत, हेच रामायण आणि भुल्लुक काळातील मानव जातीचे वंशज त्या देशात आहेत.