Get it on Google Play
Download on the App Store

भरताने हनुमानाला दिलेली भेट

अध्यात्मिक रामायणात एके ठिकाणी असे लिहिले आहे की श्री रामचंद्र जेव्हा चौदा वर्षांचा वनवास संपवून लंका जिंकून सीतेसह अयोध्येला परतले तेव्हा त्यांनी भरताला आपल्या आगमनाची माहिती देण्यासाठी हनुमानाला पुढे पाठवले. जेव्हा हनुमानाने भरताला श्रीरामाच्या आगमनाची सुवार्ता दिली तेव्हा तो खूप प्रसन्न झाला आणि हनुमानाला म्हणाला-

आलिंगय भरतःशोचं मारुति प्रियवादिनम् ।

आनन्दरथु जलै सिषेच भरतः कपिम् ॥५६।।

दैवौवामानुषोवात्वमनुकोशादिहागतः ।

प्रियाख्यानस्य ते सौम्य ददामिव वत: प्रियमम् ॥५०॥

गवांशत सशस्त्रं ग्रामाणां च शतं वरम् ।

सर्वाभरण सम्पन्ना मुग्धाः कन्यास्तुषोडश ||६१||

(अध्यात्म श्रीरामयण युद्ध काण्ड सर्ग १४)

अर्थ

भरताने तत्काळ प्रिय हनुमानाला आपल्या ह्रदयाशी स्थान दिले  आणि त्या श्रेष्ठ वानराला आनंदाश्रूंनी  भिजवून टाकले आणि तो म्हणाला, हनुमाना! तू देव आहेस की मनुष्य आहेस जो इथे दया दाखवून आला आहेस?अरे सज्जन माणसा! ही सुंदर बातमी ऐकवल्याच्या बदल्यात मी तुला एक लाख गायी, शंभर चांगली गावे आणि सर्व अलंकारांसह सोळा सुंदर मुली देतो.

येथे, भरताने हनुमानास मनुष्य किंवा देवता म्हटले होते आणि त्यांना वानर किंवा देवता मानले नाही. अन्यथा त्याने असे दान कधीच दिले नसते. म्हणूनच बक्षीस म्हणून त्यांनी  एक लक्ष गायी, शंभर गावं आणि  सोळा अलंकृत मुली भेट म्हणून दिल्या.गायी, गावे आणि मुली या केवळ मानवाच्या वापराच्या वस्तू आहेत, म्हणून भरताने हनुमानाला हे दान दिल्याने त्याला मानव म्हणून घोषित केले.

इतक्या पुराव्याच्या साक्षीने आशा आहे की आता कोणीही महात्मा हनुमानाला शेपूट असलेले माकड म्हणण्याचे धाडस करणार नाही. या पुस्तकाचा जनमानसात सन्मान होईल, अशी अपेक्षा आहे. ,