सिंधुताई
वर्धा जिल्ह्यातील सिंधूताईंनी आपल्यावर झालेले अन्याय पाहूनच की काय इतर कुणाचे त्यांच्या सारखे हाल होऊ नयेत म्हणून त्यांनी महिलांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्याकाळी शेण-गोठा करायला जाणाऱ्या महिलांना रोजगार आणि मजुरी मिळत नसे त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता.
सिंधुताई अगदी तळागाळातल्या समस्यांना समजापुढे घेऊन आल्या ज्या कदाचित कधी कुणाच्या ध्यानी मनीही आल्या नसतील किंवा त्या समस्यांना कधी इतरांनी आणि तत्कालीन सामजिक कार्यकर्त्यांनी महत्व ही दिले नव्हते. या कार्याची सिंधूताईना मोठी किंमत त्यांना मोजावी लागली.
त्याकाळी माईंच्या चारित्र्यवर शिंतोडे उडवणारे आरोप देखील झाले. त्यांच्या सासरच्यांनीही साथ खूप आधीच सोडली होती.
त्यादिवसापासून चिंधीचा जीवन संघर्षचालू झाला तो समाजसेविका सिंधूताईं आणि इतरांची माई इथे येऊन संपला. बेघर झाल्यानंतर त्या अनेक ठिकाणी भटकत राहिलेल्या.