Get it on Google Play
Download on the App Store

भक्षक

सिंधुताई फार शिकल्या नव्हत्या त्यामुळे त्यांना कुठे नोकरी मिळाली नाही शिवाय वर्ध्यातून कधीच बाहेर न पडलेल्या वीस वर्षाच्या मुलीसाठी हा समाज एखाद्या दबा धरून बसलेल्या भक्षकप्रमाणे होता. तरी त्या कधी कुणाच्या दरी गेल्या नाहीत. त्या कधी रेल्वेच्या डब्यात राहिल्या, तर कधी स्मशानात.

आपले आणि आपल्या लहान मुलीचे पोट भरण्यासाठी त्यांनी त्या क्रूर समाजात हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न केला.

सिंधुताई सकपाळ यांच्यावर भीक मागण्याची हि वेळ आली, परंतु यातूनच त्यांनी समाजाला अनाथांच्या प्रश्नांचे हृदयद्रावक दर्शन दिले.

सिंधुताई जेव्हा स्वतःच्या आणि मुलीच्या पोटाची खळगी भरण्याच्या प्रयत्नात फिरत होत्या तेंव्हा त्यांना अनाथांची आई होण्याची प्रेरणाही मिळाली. त्या नेहमी म्हणायच्या त्या अनाथांना आणि त्यांना भुकेनेच एकत्र आणले आहे. त्या या भुकेलाच आपली प्रेरणा मानत होत्या. माईंनी स्वत:ची भूक भागवताना अनाथ भुकेल्यांना आपल्या पानातील घास देत त्यांनी समजला उकलणार नाही असा आगळा वेगळा प्रपंच सुरू केला होता. त्यांचा हा प्रयत्न खूप वाखाणण्याजोगा होता. हाच त्यांचा प्रपंच पाच माणसांवरून आज हजारो अनाथ मुलांच्या आश्रायस्थानाचे मुळ बनला आहे.