Get it on Google Play
Download on the App Store

निपक्षपाती

सिंधुताई सपकाळ यांनी अन्नासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागायला सुरुवात केली होती तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की लोकांनी सोडलेली अनेक मुले आहेत आणि त्यांनी स्वतःचे म्हणून इतर सगळ्या मुलांना दत्तक घेतले. त्यानंतर सिंधुताई त्या मुलांना खायला घालण्यासाठी अधिक जोमाने लोकांना विनवू लागल्या.

सिंधुताई सपकाळ यांनी आपली पोटची सख्खी मुलगी नंतर श्रीमंत दगडू शेठ हलवाई, पुणे या ट्रस्टला दत्तक दिले. आणि स्वतः दत्तक घेतलेल्या मुलांसाठी निपक्षपातीपणे कार्याला सुरुवात केली. सिंधुताई सपकाळ यांनी चौऱ्याऐंशी गावांच्या पुनर्वसनासाठी लढा दिला आहे.

आंदोलना दरम्यान त्यांनी तत्कालीन वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांची भेट घेतली होती. सरकारने पर्यायी जागेवर योग्य ती व्यवस्था करण्यापूर्वी गावकऱ्यांना विस्थापित करू नये, असे त्यांनी मान्य करून घेतले. पंतप्रधान इंदिरा गांधी या व्याघ्र प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आल्या तेव्हा यांनी मा. पंतप्रधांनाना वन्य अस्वलाने मारल्यामुळे डोळे गमावलेल्या आदिवासीचे फोटो दाखवले.

सिंधुताई त्यावेळी इंदिरा गांधींना म्हणाल्या, "जंगली प्राण्याने गाय किंवा कोंबडी मारली तर वनविभागाने नुकसान भरपाई दिली, तर मग माणसाला मारल्यावर का नाही? इंदिरा गांधी यांनी लगेचच नुकसान भरपाईचे आदेश दिले."

अनाथ आणि परित्यक्‍त आदिवासी मुलांच्या दुरवस्थेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तुटपुंज्या अन्नाच्या मोबदल्यात मुलांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लवकरच, ते त्यांच्या आयुष्याचे ध्येय ठरले. त्यांनी अनाथांसाठी स्वत:ला वाहून घेतले. परिणामी, त्यांना प्रेमाने "माई", म्हणजे "आई" असे संबोधले जाऊ लागले.

त्यांनी १५०० अनाथ मुलांचे पालनपोषण केले. त्यांचे ३२८ जावई आणि ४९ सुना असा भव्य परिवार आहे. त्यांच्या कामासाठी त्यांना सातशेहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी पुरस्काराची रक्कम अनाथ मुलांसाठी घर बनवण्यासाठी व जमीन खरेदी करण्यासाठी वापरली.