Get it on Google Play
Download on the App Store

एक

आकाशातून उल्का कोसळली. ती थेट प्रशांतच्या कपाळावर पडेल असं क्षणभर वाटून गेलं. मालाडच्या झकेरिया रोड भागातील पाच मजली चाळीच्या गच्चीतल्या पाण्याच्या टाकीवर आडवा पडलेला प्रशांत ताडकन उठून बसला. त्याच्या शेजारी आडव्या पडलेल्या प्राचीने ताबडतोब त्याचा हात धरला आणि हलकेच दाबला आणि खाली पडणाऱ्या उल्केकडून काहीतरी मागून घे, इच्छा पूर्ण होईल असं सांगितलं. दोघांनीही डोळे मिटले. प्रशांतने डोळे उघडले तेव्हा त्याला प्राची झोपी गेल्याचे दिसले.

प्रशांतच्या डोळ्यातून झोप केव्हाच उडाली होती जेव्हा त्याने प्राचीला लाजत लाजत 143 असं म्हणून प्रपोज केलं होतं आणि प्राचीने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की आय लव्ह यु अॅज अ फ्रेंड. आणि तिच्या या वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रशांतने 'उपनिषदे', 'रामायण', ‘महाभारत’, 'द सिक्रेट' पासून 'द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक'  पर्यंत सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला होता. ‘स्त्री-पुरुष परस्पर संबंध’ या गहन विषयात ‘डॉक्टरेट’ मिळवलेल्या आपल्या काही मित्रांचाही त्याने सल्ला घेतला, पण त्याला टिप्स देण्याऐवजी ‘कोण आहे तो चुतीया?' या प्रश्नाच्या उत्तरातच त्यांना जास्त रस रस होता. प्रशांतला त्यांच्याकडून उत्तर मिळेल असे वाटत नव्हते.

शेवटी कंटाळून त्याने प्राचीलाच विचारले - "या वाक्याचा अर्थ काय?"

प्राची तिच्या मृगनयनांना नाचवत प्रशांतच्या डोळ्यात बघत त्याच्या गालावर तिचा उबदार श्वास सोडत त्याच्या कानात हळूच कुजबुजली-

"तू जगातला सर्वात क्युट मुलगा आहेस."

मग थोड्याशा गांभीर्याने त्याच्या चेहऱ्यापासून दूर जात ती म्हणाली-

"आणि सर्वात बुद्धिमान देखील! वेळ आली कि तुला आपोआप समजेल. सध्या ईतकच लक्षात ठेव की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नसते."

यानंतर प्राचीच्या डोळ्यातून टप-टप अश्रू वाहू लागले.

“मला वाटायचं की मी माझं दु:ख मित्रांबरोबर शेअर करून कमी करेन. पण माझा बेस्ट फ्रेंड  त्यालाच कितीतरी प्रोब्लेम्स आहेत. मग माझ्या आयुष्यात काय चालले आहे हे त्याला कसं माहीत असणार? मी इतकी वाईट आहे का? माझ्याच बाबतीत हे असं का होतं? व्हाय मी?"

प्रशांतच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसू लागली.तो रडवेला झाला. त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले. आई अगदी बरोबर म्हणायची की प्रशांत खूप क्रूर मनाचा आहे, अगदीच निर्दयी! प्रशांतला साधं एका मुलीच्या मनात काय आहे हे ओळखता येत नाही. ती खूप दुःखात आहे आणि ती तिचे दु:ख प्रशांतला आपले मानून सांगते, पण प्रशांत! त्याचेच प्रोब्लेम संपत नाहीत.

त्याने प्राचीचे अश्रू पुसले. तिने लगेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. प्राची त्याला बराच वेळ बिलगून होती. तिच्या अश्रूंनी त्याचा शर्ट पार भिजला होता. प्रशांतला क्षणभर वाटलं जणू काही संपूर्ण जगात जलप्रलय आला आहे.

आणि या पूरग्रस्त जगात एकमेव जहाज शिल्लक आहे आणि त्या जहाजाचा प्रशांत नोव्हा प्रमाणे एकमेव नावाडी जिवंत राहिला आहे.... आणि त्याची प्रेयसी आपला जीव वाचवणाऱ्या हिरोच्या प्रेमाच्या नशेत वादळानंतर निरभ्र झालेलं आकाश त्या जहाजाच्या डेकवर उभी राहून न्याहाळत आहे आणि प्रियकराची थेट प्रशंसा करायला लाजते म्हणून चंद्र आणि चांदण्यांची प्रशंसा ती करत्ये.

वाह! प्रेम असावे तर असे प्रलय काळातही प्रियकर फक्त आपल्या प्रेमाचाच विचार करतो. प्रशांतला क्षणभर असे वाटले की जणू तो अॅडम आणि ती इव्ह, ती हीर आणि तो रांझा, तो रोमियो आणि ती ज्युलियेट, ती शिरीन आणि तो फरहाद, ती लैला तो मजनू, तो अमिताभ ती जया, ती डिम्पल आणि तो काका, तो रितेश आणि ती जीनिलीया आहेत आणि विश्वाची निर्मिती करण्यासाठीच भेटले आहेत.

तेवढ्यात प्राची उठली. आणि नुसती उठली नाही तर ताडकन उभी राहीली

"प्रशांत यार, आज खूप उशीर झाला. मला घरी सोड."

प्रशांतची तंद्री भंग झाली. आत्तापर्यंत त्याला आशा होती की प्राची आपल्या फ्लॅटमध्ये राहील आणि रात्रभर प्रशांत तिला बघत बसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्या रात्रीवर कविता लिहील आणि दुसऱ्या दिवशी रात्री प्राचीला पाठवेल. हि वेडी आशा फोल ठरल्यामुळे प्रशांतचा कंठ दाटून आला, डोळे अश्रुनी भरून आले आणि समोरचे अस्पष्ट दिसू लागले. क्षणभर वाटले कि हृदय पिळवटून निघाले आहे. कोणीतरी धारदार शस्त्र वापरून हृद्य आणि मेंदू आणि पर्यायाने मन शरीरापासून वेगळे कापून काढले असावे इतक्या वेदना त्याला झाल्या.

प्रशांतने तिला पटवण्याचा शेवटचा प्रयत्न करून पहिला-

“इतकी रात्र झाल्ये. तू आज इकडेच का थांबत नाहीस? काय प्रोब्लेम आहे? मी तुला बलात्कारी वाटतो का?”.

प्राचीने पायात आपल्या चपला सरकवल्या आणि म्हणाली-

“चूप रे, काहीही हं! आणि तुला काय वाटतं? माझ्यावर रेप इतका सहज होऊ शकतो? मी नाकावर ठोसा मरीन कि नाही?”

मग तिने हळूच प्रशांतचे नाक दोन बोटात पकडून हलवले आणि म्हणाली

“ तू बलात्कार वगैरे करूच शकत नाहीस.”

मग प्रशांतच्या डोळ्यात पाहून म्हणाली-

“एक्चुली, तुला रेप करायला जमणारच नाही”

प्रशांतचा चेहरा क्षणार्धात गोरामोरा झाला. तो रागाने लालबुंद झाला होता. एखाद्या अत्यंत देखण्या स्त्रीला वांझ म्हणून हिणवले कि कसा राग येतो आगदी तितकाच राग त्याला आला होता. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि त्याचा जणू पूर आला आहे असं त्याला वाटलं.