Get it on Google Play
Download on the App Store

तीन

संध्याकाळी प्रशांत ने प्राचीला वॉट्सएप वर मेसेज केला “फ्रेंड्स कॅफे! वेटिंग देअर फॉर यु!”

थोड्याच वेळात प्राची तिची मैत्रीण स्निग्धा आणि पूर्वा यांना सोबत घेऊन तिकडे पोहचली. प्राचीने दोघींची प्रशांतशी ओळख करून दिली.

स्निग्धा पुढे बोलू लागली..

“हे, यू नो। पूर्वा बरोबर हॉटेल मध्ये गेलं न तर ती म्हणते रेस्टोरंट हॉपिंग करूया। आता रेस्टोरंट मध्ये माणूस खायला जातो ना शॉपिंग करण्यासाठी थोडीच जातो।”

प्रशांत हसत हसत म्हणाला, ”प्राचीला सुद्धा अशीच सवय आहे.”

स्निग्धा - “मागच्या वेळी मी आणि पूर्वा डीमसमला गेलो होतो, तेव्हा पूर्वाने खूप गोंधळ घातला होता. भूक लागली आहे, भूक लागली आहे. मागेच लागली सुशी घे सुशी घे आणि मागते काय तर व्हेज सुशी. आता व्हेज सुशी म्हणजे काय प्रकार आहे हे कोणी सांगू शकेल का? बरं, तरीसुद्धा आम्हाला म्हणून ते कळलं. आम्ही आपलं मागवलं, व्हेज सुशी! डिश आल्यावर तिने एक घास घेतला आणि म्हणे भात थोडासा चिकट आहे. नाही का? मी म्हणाले हो, मग?  दोन बाइट्स घेताना पंधरा वेळा भात चिकट झाला आहे असे पालुपद तिने लावले होते. आणि नंतर म्हणते की माझं पोट तर भरलंय आता.मग सगळं उरलेलं जबरदस्ती मला संपवावं लागलं माहित्ये...”

प्रशांत- “हा हा हा... प्राची पण असंच करते माहित्ये.... हे गोरे गोरे लोक असतात ना यांचे लाल लाल गाल असतात ते असेच करतात. मी आणि प्राची किती वेळा बारबेक्यू नेशन मध्ये गेलो आहोत. तिकडे   प्राची दोन घास खाते आणि अचानक म्हणते माझं झालं! अरे यार पण माझं तर खाऊन होउ दे आणि मग माझ्या मागे लागते चल, चल लवकर, निघुया निघूया...”

स्निग्धा - “हा हा हा... हो एकदम बरोबर ऑब्झर्वेशन कुठं आहे तुझं...हे म्हणत असताना स्निग्धा पूर्वा आणि प्राची या दोघींना ना कोपरखळी दिली. प्राची लाजली

प्रशांत- “आणि तुला माहिती आहे? मी अजून एक गोष्ट नोटीस केली आहे. हे गोरे लोक असतात ना पहिले जेवण ऑर्डर करतात मग त्याची चव घेतात आणि नंतर ठरवतात ते पुढे ते खावं की नाही ते. आपण गरीब बिचारे! जे ऑर्डर करतो ते निमुटपणे खाऊन टाकतो. आपल्याला काय जेवण थोडं उन्नीस बीस असलं तरी चालतं फारसा फरक पडत नाही. पण यांना.... चव जरा जरी मनासारखी नसेल ना तर त्यांच्यासाठी मात्र तो मोठा प्रोब्लेम असतो. खाण्याच्या बाबतीत यांची फारच नाटकं असतात”

आता मात्र प्राचीन वैतागली म्हणाली "म्हणजे इतके दिवस तू ही गोष्ट मनात ठेवून होतास की मी नुसतं जेवण ऑर्डर करते पण  खात नाही आणि वाया घालवते बरोबर नाही का?"

प्राची चिडली आहे हे लक्षात येताच प्रशांतला ठसका लागला प्रशांतने टेबलवर ठेवलेल्या काचेच्या ग्लासातून एक घोट पाणी प्यायलं तो थोडा सेटल झाला आणि म्हणाला "अगं मी तर मस्करी करतोय. बर ते जाऊदे तुम्ही स्वीट काय घेणार सांगा पाहू, इथे बल्गेरियन केक एकदम मस्त मिळतो .फेमस  आहे..."

पूर्वा लगेच म्हणाली “हो हो हो तो बल्गेरियन केक काय तोच मागवूया”

मग पुढे कोणी काही म्हणायच्या आतंच प्रशांतने तीन हजार चारशे नव्वद रुपयांचे बिल पे करून टाकलं आणि उरलेलं जेवण पार्सल करून द्या असं सांगितलं. स्निग्धा आणि प्राची त्यांच्या कार्डाने पेमेंट करण्यासाठी आग्रह करत होत्या पण त्याने ऐकलं नाही.

पेमेंट झाल्यावर तो हसत हसत पणे म्हणाला “राहू दे गं. पैसे नसते तर मी मागून घेतले असते. आनंद एवढाच की प्राचीचा मूड चांगला झाला हेच महत्त्वाचं."

मग पूर्व आणि प्राची एका सुरात  त्या म्हणाल्या ”ऑSSS सो क्युट!!!! यु आर लकी प्राची”