पोफळीतल्या चेटकीणीच्या झिंज्या (Marathi)
अक्षय मिलिंद दांडेकर
जेव्हा ते घराच्या दिशेने परत येत होते, तेव्हा त्यांनी पोफळीच्या झाडावरून खाली लटकलेला लांब केसांचा एक झुबका पहिला. झाडावरून लटकत असलेला जाडजुड लांब केसांचा झुबका पाहून त्यांना लगेच समजले की काही किरकोळ गोष्ट नाही.त्यांना आधी खूप भीती वाटली पण बुवा निःसंशयपणे खूप धैर्यवान व्यक्ती आहेत हे मान्य करावेच लागेल. त्यांनी लगेच कोयता बाहेर काढला जो ते त्यांच्या कनवटीला अडकवून ठेवायचे. क्षणार्धात त्यांनी कोयत्याने लांब केसांच्या झुबक्याचे टोक कापले आणि तिथून पळ काढला. केस कोयत्याने कापताच त्यांना एक विचित्र आणि भयंकर किंचाळी ऐकू आली. त्यांच्या म्हणण्यानुसार ती किंचाळी इतकी जोरदार होती की तिच्यामुळे कानाचे पडदे फाटतील. त्यांच्या अंगावर काटा आला होता. त्यांना दरदरून घाम फुटला होतं. ते धापा टाकत टाकत घरात पळून आले आणि लगेच आत जाऊन दरवाजा बंद केला.READ ON NEW WEBSITE