जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (Marathi)
रुद्रमुद्रा रमेश अणेराव
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा टेलिस्कोप युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या योगदानाने विकसित केलेली एक अंतराळातील दुर्बीण आहे. टेलीस्कोपचे नाव जेम्स ई. वेब यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, जेम्स वेब १९६१ ते १९६८ पर्यंत नासाचे एक अविभाज्य घटक होते आणि त्यांनी अपोलो कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली होती. खगोल भौतिकशास्त्रातील नासाचे प्रमुख मिशन म्हणून हबल स्पेस टेलिस्कोप यशस्वी करण्याचा त्यांचा हेतू होता.READ ON NEW WEBSITE