नकाशे
जगाचे सर्व नकाशे चुकीचे आहेत. कसं ते पाहू..
वास्तवात स्पेन हा स्वीडन पेक्षा मोठा देश आहे.
स्वीडन चं क्षेत्रफळ - ४४९,९६४ चौ. कि. मी.
स्पेन चं क्षेत्रफळ - ५०४,६४५ चौ. कि. मी.
त्याचप्रमाणे कॅनडा हा अमेरिकेपेक्षा फक्त ५ टक्के मोठा आहे.
वास्तवात ऑस्ट्रेलिया हा ग्रीनलैंड पेक्षा ३.५ पट मोठा आहे.
भारत हा ग्रीनलैंड पेक्षा १.५ पट मोठा आहे.
नकाशावर अलास्का हा ब्राझील एवढी जागा व्यापतो परंतु प्रत्यक्षात पाहता ब्राझील चं क्षेत्रफळ हे अलास्काच्या ५ पट आहे.