लॉस अन्जेलीस ची लढाई
२४ फेब्रुवारी १९४२ ला एका स्थानिक लॉस अन्जेलीस च्या हवाई तळावर खबर आली की एक युएफओ (अनोळखी उडती तबकडी) दिसली आहे. पर्ल हार्बर च्या हल्ल्यानंतर आणि जपानच्या हल्ल्याच्या शंकेने आकाश प्रकाशमान करून त्या विमानाचा शोध घेतला गेला. त्या विमानावर अनेक वेळा गोळीबार करण्यात आला, परंतु त्यामुळे त्या विमानाला कोणतेही नुकसान पोचले नाही आणि काही वेळाने रात्री ते विमानं कायमचं नाहीसं झालं.