हिजरा अथवा हिजरी कालगणना
पुढे सर्वच मुस्लिमधर्मीयांना मक्का सोडून मदिनेला जाण्याची पाळी आली. मदिना हे एक उत्तर दिशेला ओऍसिसचे शहर होते. तेथे दुसऱ्या जमातीचे वर्चस्व होते व त्यातील बरेचसे ख्रिस्ती व ज्यू होते. मुहंमदालाहि आता कुरैशी जमातीकडून धोका होता. सर्व मुस्लिमांना मदिनेस पाठवून कुरैशींच्या ठरलेल्या हल्ल्याच्या आदल्या रात्री महंमद व अबूबकर जिवानिशी मक्केतून निसटून मदिनेला पोचले. या स्थलांतरालाच हिजरा वा हिजरी म्हणतात व इस्लामची कालगणना तेथून सुरू होते.