आरती श्रीविठ्ठलाची, प्रार्थना - आरती श्रीविठ्ठलाची युगें ...
आरती श्रीविठ्ठलाची
युगें अठ्ठावीस विठेवरी उभा ॥ वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥ चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जय देव जय देव जय पांडुरंगा ॥ रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥धृ०॥ तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटीं ॥ कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटीं ॥ देव सुरवर नित्य येती भेटी ॥ गरुड हनूमंत पुढें उभे रहाती ॥जय०॥२॥ धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ॥ सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां ॥ राई रखुमाबाई राणीया सकळा ॥ ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ज०॥३॥
ओंवाळूं आरत्या कुर्वंड्या येती ॥ चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ॥ दिंड्या पताका वैष्णव नाचती ॥ पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥जय०॥४॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती ॥ चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती ॥ दर्शन हेळामात्रें तयां होय मुक्ती ॥ केशवासी नामदेव भावें ओंवाळिती ॥ जयदेव०॥५॥
प्रार्थना
घालीन लोटांगण वंदीन चरण ॥ डोळ्यांनि पाहिन रूप तुझें ॥ प्रेमें आलिंगिन आनंदें पूजिन ॥ भावें ओंवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥ त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ॥ श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥
हरेराम हरेराम रामराम हरेहरे । हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्णकृष्ण हरेहरे ॥५॥