अध्याय ५१
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥
जय जय दीनदयाळा हृषीकेशा ॥ सप्रेमभक्तहृदनिवासा ॥ रुक्मिणीरंगा पंढरीशा आदिसर्वेशा जगद्गुरो ॥१॥
जय जय लीलानाटकी सूत्रधारिया ॥ गुणनिधाना यादवराया ॥ हृदयीं आठवूनि तुझिया पायां ॥ समुद्रतनया तल्लीन ॥२॥
जय अंतरसाक्षा चराचरवासा ॥ आदिस्वरूपा निर्गुणवेषा ॥ पुंडलीकवरदा परेशा ॥ जय अविनाशा आत्मरूपा ॥३॥
जय करुणासागरा वैकुंठपती ॥ विराट्स्वरूप वामनमूर्ती ॥ तुवां परशुधरें निर्वीर करूनि क्षिती ॥ विप्रांप्रति स्थापिलें ॥४॥
जय असुरदमना धर्मस्थापका ॥ त्रैलोक्यपते विधिजनका ॥ प्रेमळ भक्तांसी सज्जनसखा ॥ तुजविण आणिक असेना ॥५॥
म्यां निजमुखें करावी तुझी स्तुती ॥ तरी बुद्धीस नाहीं अखंड स्फूर्ती ॥ अर्चन अक्रावें निजप्रीतीं ॥ तरी साहित्य निश्चितीं घडेना ॥६॥
अनुतापें करावें तीर्थाटन ॥ तरी शरीर जाहलें शक्तिहीन ॥ नातरी सत्पात्रीं करावें दान ॥ तरी पदरीं धन नसे कीं ॥७॥
व्रत करावें विधियुक्त ॥ तरी क्षुधेनें प्राण व्याकुळ होत ॥ वंदोनि नमावीं सर्व भूतें ॥ तरी गुणदोष आठवत अंतरीं ॥८॥
शास्त्राभ्यास करूं श्रीपती ॥ तरी आयुष्य नाहीं आपुले हातीं ॥ अनुतापें टाकावीं प्रपंचभ्रांती ॥तरी वैराग्य चित्तीं ठसेना ॥९॥
एकांतीं करावें तुझें ध्यान ॥ तरी बुद्धीसी नावरे चंचळ मन ॥ टाकूनि स्वरूपानुसंधान ॥ रानोरान हिंडतसें ॥१०॥
नातरी करावें इंद्रिय दमन ॥ तरी रसना नव्हे स्वाधीन ॥ ऐसा वेष्टिलों अवगुणेंकरून ॥ जाणसी खूण अंतरींची ॥११॥
म्हणोनि प्रार्थना रुक्मिणीपती ॥ जे निजभक्त तुजला प्रिय असती ॥ त्यांची वर्णावया सद्गुण कीर्ती ॥ सप्रेम स्फूर्ति असों दे ॥१२॥
कायावाचामनेंकरून ॥ हेंचि वांछितों प्रसाददान ॥ याविरहित इच्छा नसे आन ॥ तरी मनोरथ पूर्ण करावा ॥१३॥
ऐका श्रोते हो सादर गोष्टी ॥ मागिल अध्यायीं कथा गोमटी ॥ तुकयानें सप्रेम होऊन पोटीं ॥ पत्रिका शेवटीं पाठविली ॥१४॥
ते चोवीस अभंग घेऊनि सत्वरीं ॥ पंढरीस चालिले वारकरी ॥ मार्गीं जातां स्वानंदलहरी ॥ कीर्तनगजरीं डुल्लत ॥१५॥
ऐका खेळींमेळीं सत्वरा ॥ वैष्णव आले पंढरपुरा ॥ सकळ देखतांचि त्या अवसरा ॥ लोटांगण एकसरा घातलें ॥१६॥
एकमेकांस आलिंगन देती ॥ आनंदाश्रु नेत्रीं वाहती ॥ आरती करूनि श्रीपती ॥ ओंवाळिती प्रीतीनें ॥१७॥
मग दिंड्या पताका घेऊन करीं ॥ आले चंद्रभागेचे तीरीं ॥ स्नान करूनि झडकरी ॥ नित्यनेम सारिला ॥१८॥
पुंडलीकासी भेटोनि जाणा ॥ मग केली क्षेत्रप्रदक्षिणा ॥ टाळ मृदंग लावूनि नाना ॥ नृत्य करिती स्वानंदें ॥१९॥
असो यावरी वैष्णववीर ॥ सत्वर पावले महाद्वार ॥ पुढें देखोनि गरुडपार ॥ लोटांगणें घालिती ॥२०॥
पत्र लिहिलें जें तुकयान ॥ तें आनंदें गाती वैष्णवजन ॥ ऐसी करुणा ऐकूनि रुक्मिणीरमण ॥ गहिंवरें दाटले तेधवां ॥२१॥
सावकाश नाहीं तुकयासी ॥ म्हणोनि घाबरले हृषीकेशी ॥ जैसें पाडस पाडतां पारधीफांसीं ॥ ते व्यथा हरिणीस वाटत ॥२२॥
कीं बाळकासी देवी निघतां जाण ॥ चैन न पडे मातेकारण ॥ तेवीं तुकयाचें पत्र ऐकून ॥ जगज्जीवन घाबरले ॥२३॥
जीवन जळदेवता शोषितां पाहीं ॥ मत्स्य तळमळती आपुले ठायीं ॥ तेवीं तुकयाची करुणा ऐकूनि पाहीं ॥ शेषशायी घाबरले ॥२४॥
कीं कृपणाचिया धनावर ॥ पाळती लावी तस्कर ॥ ऐकोनि दचके त्याचें अंतर ॥ तेवीं शारंगधर घाबरले ॥२५॥
मग रुक्मिणीसी म्हणे वैकुंठपती ॥ तुकयाची मज वाटते खंती ॥ म्हणोनि सद्गदित होऊनि चित्तीं ॥ अश्रु पडती नेत्रकमळीं ॥३६॥
वारकरी आले सकळिक ॥ परी दृष्टीसी तुकया न दिसे एक ॥ म्हणोनि माझे जीवासी सुख ॥ न वाटे देख सर्वथा ॥२७॥
आतां आपण जावें येथून ॥ तरी यात्रेसी आले बहुत जन ॥ यासी विचार करावा कवण ॥ तुजकारण पुसतसें ॥२८॥
यावरी रुक्मिणी बोले वचन ॥ गरुडासी मूळ पाठवावें जाण ॥ तो तुकयासेसे पाठीवरी बैसवून ॥ न लागतां क्षण आणील कीं ॥२९॥
हें सामर्थ्य असोनि आपणासी व्यर्थ कां चिंता करावी मानसीं ॥ ऐकोनि ऐसिया वचनासी ॥ हृषीकेशी संतोषले ॥३०॥
मग बोलावूनि विनतासुत ॥ तयासी सांगे पंढरीनाथ ॥ तुवां देहूसी जाऊनि त्वरित ॥ कार्य निश्चित साधावें ॥३१॥
मग स्वकरें लेखणी घेऊन ॥ पत्र लिहित जगज्जीवन ॥ ते सादर करूनि मन ॥ परिसा सज्जन भाविक हो ॥३२॥
म्हणे वैकुंठ कैलास असे जोंवरी ॥ चिरंजीव तुका असो तोंवरी ॥ आणि अखंड मजला हृदयमंदिरीं ॥ प्रेमभरें आठवो ॥३३॥
ऐसा आशीर्वाद होतां जाण ॥ तेव्हां रुक्मिणीचें विस्मित मन ॥ म्हणे हें आपुले मुखींचें वचन ॥ असत्य नोहे सर्वथा ॥३४॥
मौनेंचि हांसोनि पंढरीनाथ ॥ हृदयीं दाटले प्रेमभरीत ॥ म्हणे तुकया वाटे तुझी खंत ॥ व्यथा विपरीत ऐकोनि ॥३५॥
कैशा रीतीं म्हणसील जरी ॥ तरी तुझेंचि चित्त साक्ष अंतरीं ॥ निरोप सांगतां वारकरी ॥ जाहलों अंतरी कासाविस ॥३६॥
भेटीसी धांवोनि यावें त्वरित ॥ तरी यात्रा मिळाली आहे बहुत ॥ म्हणोनि गरुड पाठविला तेथ ॥ तुजला निश्चित आणावया ॥३७॥
तरी कांहीं संकोच न धरितां अंतरीं ॥ बैसावें याचे पाठीवरी ॥ क्षण न लागतां येऊनि पंढरी ॥ भेट दे सत्वरीं मजलागीं ॥३८॥
ऐसें लिहूनि जगज्जीवन ॥ गरुडाप्रति बोले वचन ॥ माझें ठायीं तुकया जाणून ॥ आणीं बैसवून पाठीवरी ॥३९॥
अवश्य म्हणोनि ते अवसरीं ॥ माथा ठेविला चरणांवरी ॥ म्हणे स्वामींनीं जयासी धरिलें पदरीं ॥ तो आम्हां शिरीं वंद्य असे ॥४०॥
मूर्खासी प्रसन्न सरस्वती ॥ जाहल्या पंडित सन्मानिती ॥ सरितेसी अंगीकारितां अपांपती ॥ तरी वोत अव्हेरिती कासया ॥४१॥
कीं बोरीबाभुळींसी मैलागिरीनें ॥ शेजार दिधला निजप्रीतीनें ॥ तयांसी कांटवण म्हणावें कवणें ॥ सुगंधा उणें नसेचि ॥४२॥
नातरी वाचस्पतीनें अंगीकार केला ॥ मग सकळ सुरगण मानिती त्याला ॥ कीं लोहदंड परिसासी लागला ॥ मग मलिन त्याला न म्हणावें ॥४३॥
तेवीं तुकयाचें शब्द देखोनि अंतर ॥ तुम्हीं तुष्ट जाहलेति तयावर ॥ मग आम्हांसी धरावया दूर ॥ नाहीं अधिकार सर्वथा ॥४४॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ मस्तक ठेविला चरणांवरी ॥ खगपति उठोनि झडकरी ॥ पवनचाली निघाला ॥४५॥
तों इकडे तुका उताविळ मनीं ॥ निढळावरी ठेवूनि पाणी ॥ वाट पाहात निशिदिनीं ॥ जेवीं बाळक जननी न देखतां ॥४६॥
नातरी चातकासी तृषा लागत ॥ तो तोंड पसरूनि पाहे निरुत ॥ कीं क्षुधा लागतां पोटांत ॥ कांसवी विलोकित जननीसी ॥४७॥
कीं कृपणाचें धन हारपतां सकळ ॥ त्यासी रात्रंदिवस लागतो चळ ॥ नातरी मीनाचें तुटतां जळ ॥ करी तळमळ जया रीतीं ॥४८॥
तेवीं पंढरीच्या वियोगेंकरून ॥ तुका तळमळी रात्रंदिन ॥ तों अकस्मात गरुड येऊन ॥ उभा ठाकला सन्निध ॥४९॥
खगपतीस देखतां क्षणीं ॥ नमस्कार घातला साष्टांग धरणीं ॥ आलिंगिला प्रीतीकरूनी ॥ प्रेमभावें तेधवां ॥५०॥
मग वर्तमान पुसे निजप्रीतीं ॥ सुखी आहे कीं रुक्मिणीपती ॥ मज रात्रंदिवस वाटे खंती ॥ कधीं भेटती कळेना ॥५१॥
काम निष्ठुर होऊनि जगज्जीवन ॥ कठीण केलें बहुत मन ॥ मज परदेशीं दिधलें टाकून ॥ होतसें उद्विग्न यासाठीं ॥५२॥
वारकरी मिळाले असतील फार ॥ माझा किमर्थ पडला विसर ॥ कोणता दोष जाणोनि दुर्धर ॥ हें मज निर्धार कळेना ॥५३॥
ऐकूनि तुकयाचें वचन ॥ काय बोले विष्णुवाहन ॥ तुझ्या उद्वेगें जगज्जीवन ॥ अति विव्हळ मानसीं ॥५४॥
जेवीं तान्हयाच्या वियोगें जननी ॥ कीं पाडसवियोगें जैसी हरिणी ॥ कीं तृषाक्रांत जीवनावांचूनी ॥ तळमळ मनीं करीतसे ॥५५॥
तैशापरी रुक्मिणीपती ॥ रात्रंदिवस तुज आठविती ॥ मग मूळ पाठविलें मज निश्चितीं ॥ न्यावयाप्रति तुजलागीं ॥५६॥
पत्र पाठविलें रुक्मिणीकांतें ॥ तें तुकयासी वाचून दाविलें त्वरित ॥ तें श्रवणीं पडतां अश्रुपात ॥ नेत्र सजल जाहले कीं ॥५७॥
तें पत्र हाती घेऊनि सत्वर ॥ मस्तकीं ठेवी वारंवार ॥ मागुती हृदयीं धरूनि कर ॥ आलिंगित निजप्रीतीं ॥५८॥
जैसा सुकत्वा झाडावरी सहज ॥ अवचितां ओळला मेघराज ॥ तेवीं पत्र देखतांचि अंडजराज ॥ तुकयास संतोष वाटला ॥५९॥
कीं उदया येतां वासरमणी ॥ संतोष पावती जैशा कमळिणी ॥ तेवीं गरुडाचें आगमनीं ॥ तुकयासी संतोष वाटला ॥६०॥
नातरी श्रीरामाची वाट पाहात ॥ नंदिग्रामीं बैसला भरत ॥ मग निरोप सांगतां अंजनीसुत ॥ संतोष वाटत ज्या रीतीं ॥६१॥
तेवीं पत्र पाठविलें रुक्मिणीवरें ॥ आणि निरोप सांगितला खगेश्वरें ॥ तेणें तुकयाचें अंतर ॥ जाहलें स्थिर ते समयीं ॥६२॥
मग गरुड बोले मधुरोत्तरीं ॥ आतां बैसावें माझे पाठीवरी ॥ निमेष न लागतां सत्वरीं ॥ दावीन पंढरी तुजलागीं ॥६३॥
रोगें शरीर जर्जर बहुत ॥ चालावयासीं नाहीं शक्त ॥ मग कृपा करूनि पंढरीनाथ ॥ पाठवी त्वरित मजलागीं ॥६४॥
तरी आतां ऊठ वेगेंसीं ॥ विलंब न करावा जावयासी ॥ वचनें ऐकोनियां ऐसीं ॥ उत्तर तयासी देतसे ॥६५॥
खगपतीस म्हणे ऐक वचन ॥ तूं आमुचे स्वामीचें वहन ॥ आनि आम्हां सेवकां पूज्यमान ॥ होसी सुजाण विचक्षणा ॥६६॥
पायींची वाहाण पायीं बरी ॥ वागवूं नये मस्तकावरी ॥ कीं बाळे नेपुरें बांधितां शिरीं ॥ विचार चतुरीं करावा ॥६७॥
कीं महाद्वारींची पायरी पाहें ॥ प्रतिमास्थानीं बैसेल काये ॥ हडापी आवडाता म्हणोनि रायें ॥ बैसवूं नये सिंहासनीं ॥६८॥
म्हणोनि विष्णुवाहना अवधारीं ॥ मी सर्वथा न बैसें तुजवरी ॥ तुझें भाग्याची वर्णितां थोरी ॥ मज निर्धारीं कळेना ॥६९॥
जो पुराणपुरुष वैकुंठविहारी ॥ अनंत ब्रह्मांडें जयाचें उदरीं ॥ तया वागविसी पृष्ठीवरी ॥ नवल अंतरीं वाटतसे ॥७०॥
जो सुरां असुरां अजित जाण ॥ तयासी जिंतोनि सांडला पण ॥ शेखीं जाहलासी त्याचें वहन ॥ सदा कर जोडून तिष्ठसी ॥७१॥
म्हणोनि आम्हां उपासकां जाण ॥ सेवक स्वामी तत्समान ॥ यालागीं पाठीवरी बैसोन ॥ न घडे येणें सर्वथा ॥७२॥
तरी आतां असो हेचि विज्ञप्ती । माझी अवस्था जाणोनि चित्तीं ॥ पंढरीसी जाऊनि सत्वरगती ॥ रुक्मिणीपति आणावा ॥७३॥
मग गरुडाचे धरूनि चरण ॥ साष्टांगें घातलें लोटांगण ॥ म्हणे तुम्हांआधीन जगज्जीवन ॥ तो मज आणोन भेटवा ॥७४॥
अवश्य म्हणोनि त्वरित ॥ सत्वर निधाला विनतासुत ॥ तुकयासी भेटवीन पंढरीनाथ ॥ विचार मनांत पैं केला ॥७५॥
हा निश्चय करूनि मानसीं ॥ गरुड पावला पंढरीसी ॥ पृष्ठीवरी न देखतां तुकयासी ॥ हृषीकेशी घाबरले ॥७६॥
जैसें कन्येसी मूळ पाठवितां ॥ तें फिरोनि रितें देखिलें येतां ॥ हिंसवली उगीच राहे माता ॥ तेवीं रुक्मिणीकांता जाहलें ॥७७॥
मग सन्निध येऊनि ते अवसरीं ॥ मस्तक ठेविला चरणांवरी ॥ म्हणे देवाधिदेवा श्रीहरी ॥ तुका मजवरी न बैसे ॥७८॥
परी तुझ्या वियोगें रुक्मिणीपती ॥ रात्रंदिवस करितो खंती ॥ आतां कृपा करूनि वैकुंठपती ॥ चाल त्याप्रती भेटावया ॥७९॥
अवश्य म्हणोनि जगज्जीवन ॥ गरुडासी दिधलें आलिंगन ॥ मग रुक्मिणीसी बोलावून ॥ सांगे खूण अंतरींची ॥८०॥
मग विश्वजननी उत्तर देत ॥ यात्रेसी आले वैष्णवभक्त ॥ हा उत्साह टाकूनि जावें तेथ ॥ नसे उचित सर्वथा ॥८१॥
जैसें कांतेविण मंदिर शून्य ॥ कें जीवनाविण सरिता जाण ॥ तेवीं तुम्हांविण पंढरी शून्य ॥ वैकुंठनाथा दिसेल कीं ॥८२॥
नातरी नृपावांचोनि सेनासंपत्ती ॥ कीं चंद्राविण उडुगण दिसती ॥ कीं कुंकुमाविण अलंकार निश्चितीं ॥ मलिन दिसती सर्वथा ॥८३॥
तेवीं आपण नसतां ये अवसरीं ॥ उदास दिसेल हे पंढरी ॥ तरी गोपाळकाला जाहलियावरी ॥ जाऊं भेटीसी तुकयाचे ॥८४॥
ऐकोनि रुक्मिणीचें वचन ॥ अवश्य म्हणती जगज्जीवन ॥ तो दर्शनासी आले संतजन ॥ नामाभिधानें तीं एका ॥८५॥
शेखमहंमद आणि गणेशनाथ ॥ बोधला निंबराज विख्यात ॥ संतोबा पवार वैष्णवभक्त ॥ आले त्वरित दर्शना ॥८६॥
टाळ विणे मृदंग वाजती ॥ सप्रेमभावें वैष्णव गाती ॥ पताका शोभायमान फडफडती ॥ तयांत चमकती गरुडटके ॥८७॥
लोटांगण घालिती सकळजन ॥ तेव्हां रुक्मिणीसी बोले जगज्जीवन ॥ निंबराजासी जाहला बहु शीण ॥ घालीत लोटांवण आला तो ॥८८॥
तरी यासी प्रसन्न होऊनि त्वरित ॥ कांहीं द्यावें वरदान उचित ॥ तंव श्रोते होऊनि आशंकित ॥ प्रश करीत निजप्रेमें ॥८९॥
म्हणती निंबराज कोठील कोण ॥ तयाचें सविस्तर करीं कथन ॥ ऐसा करितांचि प्रश्न ॥ हर्षलें मन वक्त्याचें ॥९०॥
तो प्रश्न वाटला कैशा रीतीं ॥ जैसा चकोरांसी उदेला निशापती ॥ कीं क्षुधार्थियासी प्रारब्धगतीं ॥ अमृत अवचितीं वर्षलें ॥९१॥
कीं दुर्बळाचिया अंगणीं ॥ कामधेनु ठाकली येऊनी ॥ नातरी लोहसंदुकेंत जाउनी ॥ परीस अवचितां पडिला कीं ॥९२॥
कीं क्षेत्र पिकासी आलें जाण ॥ त्यावरी पुढती वर्षला घन ॥ मग द्विगुण दाटले कण ॥ ते सभाग्य जाण लाधती ॥९३॥
तेवीं श्रोतयांचे प्रश्नोत्तरीं ॥ वक्ता संतोषला निजअंतरीं ॥ म्हणे निंबराजचरित्र विस्तारीं ॥ प्रेमभरीं अवधारा ॥९४॥
स्वदेशांत ग्राम जाण ॥ देवपैठण ॥ म्हणती त्याकारण ॥ तया ग्रामींचें कुळकर्ण ॥ वृत्ति पुरातन तयाची ॥९५॥
मुलें लेंकुरें असती सर्व ॥ परी निंबराज म्हणवी भक्त वैष्णव ॥ संतपूजनीं धरितां भाव ॥ अनुताप जाहला तयासी ॥९६॥
मग म्हणे पुरे हा संसार ॥ दुर्धर माया अनिवार ॥ प्रपंच करितां व्यवहार ॥ आयुष्य समग्र वेंचलें ॥९७॥
ऐसा अनुताप धरूनि जाणा ॥ मग चालिले तीर्थाटना ॥ बारा ज्योतिर्लिंगें देखोनि नयना ॥ संतोष मना वाटला ॥९८॥
भूतळींचीं तीर्थें अवघडें ॥ तीं दृष्टीसी देखिलीं अति चोखडें ॥ सप्त पुर्या करूनि पुढें ॥ हिमालयाप्रति पैं गेले ॥९९॥
त्या मार्गींची ख्याती वर्णितां ॥ तरी बहु विस्तारें वाढेल कथा ॥ म्हणोनि संकलित बोलिलों वार्ता ॥ जाणावें श्रोतीं अंतरीं ॥१००॥
भागीरथीच्या तीन कावडी ॥ रामेश्वरीं घातल्या आवडी ॥ ऐसी सुकृताची करूनि जोडी ॥ मग आले तांतडी आश्रमा ॥१॥
अंतरीं इच्छा धरिली जाण ॥ स्वमुखें करावें हरिकीर्तन ॥ हेच आवड मनीं धरून ॥ नामस्मरण करीतसे ॥२॥
निष्कामबुद्धी व्रतें तपें ॥ आचरला असेल जो साक्षेपें ॥ तरीच श्रीहरिकीर्तनीं अनुतापें ॥ होईल रत निजप्रीतीं ॥३॥
तीर्थें याग वेदपठण ॥ हीं तेव्हांच फळासी आलीं जाण ॥ तरी निर्लज्ज होऊनि मन ॥ वर्णील गुण श्रीहरीचे ॥४॥
असो आतां बहु भाषण ॥ वैष्णव जाणती सप्रेम खूण ॥ जे टाकोनियां मानाभिमान ॥ करिती भजन अहर्निशीं ॥५॥
श्रीहरिकीर्तनीं न होतां रत ॥ सकळ साधनें होती व्यर्थ ॥ जैसी वापी खाणिली सखोल बहुत ॥ जीवन नाहीं लागलें ॥६॥
कीं क्षेत्रीं कणसें आलीं सघन ॥ परी त्यांवरी उमटले नाहीं कण ॥ कीं देसायांनीं साधिलें वतन ॥ तें संतानाविण व्यर्थचि ॥७॥
कीं विद्याभ्यास केला फार ॥ परी समयीं नाठवे प्रत्युत्तर ॥ कीं शौर्यतेजेंविण नृपवर ॥ व्यर्थचि बैसला भद्रासनीं ॥८॥
कीं पात्रीं पक्वान्नें वाढिलीं बहुत ॥ परी शेवटीं नाहीं आलें घृत ॥ तेवीं श्रीहरिचरित्र न वर्णितां होत ॥ सकळ साधनें व्यर्थचि ॥९॥
तरी कीर्तन करावें प्रेमयुक्त ॥ निंबराजे धरिला हेत ॥ मग गजवदनासी पंढरीनाथ ॥ आज्ञा करीत एके दिनीं ॥११०॥
म्हणे मत्कीर्तनीं होईल स्फूर्ती ॥ हा वर द्यावा तयाप्रती ॥ ऐसें सांगतां रुक्मिणीपती ॥ अवश्य गणपति म्हणतसे ॥११॥
एके दिनीं यामिनींत ॥ निंबराज होते निद्रित ॥ तंव ब्राह्मणरूपें स्वप्नांत ॥ पार्वतीसुत पावले ॥१२॥
थापटोनि सावध केलें पाहीं ॥ म्हणे वरप्रसाद माझा घेईं ॥ मग तांबूल काढोनि ते समयीं ॥ हातांवरी दीघलें ॥१३॥
तों निंबराजें सुषुप्तींत ॥ तत्काळ टाकिलें मुखांत ॥ मग गजवदन काय बोलत ॥ अक्षय वरदान दीधलें ॥१४॥
आतां अभ्यास केल्याविण ॥ बहुत वर्णिशील हरीचे गुण ॥ आणि रंगदेवता येऊन ॥ अखंड कीर्तनीं नांदेल ॥१५॥
ऐसा वर देऊनि त्वरित ॥ अदृश्य झाले पार्वतीसुत ॥ निंबराज होऊनि जागृत ॥ स्वप्न ध्यानांत आणिलें ॥१६॥
तों विप्र दिसत नाहीं जवळ ॥ आणि मुखांत असे साक्षात तांबूल ॥ मग तैसाचि गिळोनियां ते वेळ ॥ उठोनियां बैसला ॥१७॥
हाताकडे विलोकूनि पहात ॥ तों डाग लागला असे आरक्त ॥ उदकें करूनि क्षाळिला हात ॥ परी तों न जात सर्वथा ॥१८॥
सागरें कूपासी दिधलें पाणीं ॥ तें न आटे जैसें अवर्षणीं ॥ कीं योगियांसी तृप्त करी उन्मनी ॥ तो नव्हे परतोनि क्षुधार्थी ॥१९॥
नातरी परिसाचा गुण लोहासी लागला ॥ तरी पुढती काळिमा न येचि त्याला ॥ कां गंगेनें ओहळ अंगीकारिला ॥ तो अक्षय पूज्य सकळांसी ॥१२०॥
कीं विरिंचीनें आयुष्य दिधलें पाहें ॥ तेथें भय व्याधि सर्वथा न जाये ॥ नातरी रंकासी हातीं धरिलें रायें ॥ त्याची संपत्ति न जाय सर्वथा ॥२१॥
कां भास्करें दिधली दिव्य कांती ॥ ते हिंवें फुटेल कैशा रीतीं ॥ तेवीं तांबूलाचा डाग लागला हातीं ॥ तो धुतलिया न जाये सर्वथा ॥२२॥
मग त्या दिवसापासून ॥ निंबराज करूं लागले कीर्तन ॥ जे श्रवण करिती वैष्णवजन ॥ तल्लीन होऊन राहाती ॥२३॥
टाकूनि लज्जा मान लौकिक ॥ टाकूनि आशापाश देख ॥ टाकूनि भेदाभेद अनेक ॥ सप्रेमसुख भोगीतसे ॥२४॥
ऐसी वृत्ति असतां सहज ॥ पंढरीसी आले निंबराज ॥ येथूनि प्रश्न केलासे मज ॥ श्रोतीं उमज धरावा ॥२५॥
रुक्मिणीसी म्हणती जगज्जीवन ॥ निंबराजासी द्यावें वरदान ॥ जगन्माता तें ऐकून ॥ विस्मितमन होतसे ॥२६॥
मग माळिणीचें रूप धरूनी ॥ वाटेसी बैसली विश्वजननी ॥ आरक्त गाजरें पांटींत भरूनी ॥ फांका करूनि ठेविल्या ॥२७॥
निंबराज येतां देउळांतून ॥ तयासी बोले मधुर वचन ॥ म्हणे तान्हें बाळ घरीं रडतसे जाण ॥ मी जातें तयासी आणावया ॥२८॥
तरी कृपा करूनि मजवरी ॥ येथें बैसावें क्षणभरी ॥ मी बाळक घेऊनि सत्वरी ॥ अशीच येतें परतोनी ॥२९॥
तूं नायकेसी जरी वचन ॥ तरी येथें गाजरें राखील कोण ॥ बाजारीं फिरती बहुत जन ॥ जातील घेऊन यासाठीं ॥१३०॥
ऐसें बोलतां विश्वजननी ॥ करुणा उपजली तयाचें मनीं ॥ म्हणे सत्वर येईं परतोनी ॥ तरी मी बैसतों ये ठायीं ॥३१॥
मग पांटी करूनि त्याचे स्वाधीन ॥ राउळाकडे गेली माळीण ॥ एक प्रहरपर्यंत जाण ॥ नये परतोन सर्वथा ॥३२॥
तेव्हां वस्त्र काढोनि पांटीवरूनी ॥ निंबराज विलोकीं तये क्षणीं ॥ तों सुवर्णपाकळ्या देखिल्या नयनीं ॥ गाजर एकही दिसेना ॥३३॥
मग मनीं होऊन विस्मित ॥ म्हणे आदिमाया गोवूं पाहात ॥ कनक नव्हे हा महाअनर्थ ॥ दिसून येत मजलागीं ॥३४॥
ऐसा अनुताप दह्रिला मनीं ॥ जेवीं विप्र प्रवेशे यवनसदनीं ॥ तेथींचें मांस देखोनि नयनीं ॥ कंटाळूनि पळतसे ॥३५॥
कां गलितकुष्ठी दृष्टीस पडे ॥ तों सुंदर न पाहे तयाकडे ॥ कीं मेघातें देखूनि दृष्टीपुढें ॥ अनुतापी उठे तेथूनी ॥३६॥
तैसें तें सुवर्ण पांटींत देखोन ॥ निंबराजाचें चिळसलें मन ॥ मग राउळांत जाऊन ॥ घाली लोटांगण सद्भावें ॥३७॥
हात जोडून करी विनंती ॥ म्हणे देवा कां मज करितोसी गुंती ॥ तुझीं कृपा इच्छितों चित्तीं ॥ नलगे संपत्ति धन कांहीं ॥३८॥
मग रुक्मिणीसी करून नमस्कार ॥ बिर्याडासी आले सत्वर ॥ नामस्मरण निरंतर ॥ प्रेमभावें करीतसे ॥३९॥
इकडे रुक्मिणी म्हणे जगज्जीवना ॥ म्यां वंदोनि तुमची आज्ञा ॥ निंबराजासी दिधलें सुवर्ण जाणा ॥ परी त्याचें तें मना नये कीं ॥१४०॥
हांसोनि म्हणे जगन्निवास ॥ भजनीं संतुष्ट माझे दास ॥ तयांसी ममता लोभ आस ॥ बाधूं न शके सर्वथा ॥४१॥
पर्वता न रुतती पर्जन्यधारा ॥ कीं काळें लावितां नये अंबरा ॥ शीत न बाधेच दिनकरा ॥ न ह्योय उबारा चंद्रासी ॥४२॥
कीं तृषा न बाधे समुद्राकारण ॥ अग्नींस न बाधे कदा अन्न ॥ बंदिखान्यांत कोंडेल पवन ॥ कैशा रीतीं सुजाणे ॥४३॥
तेवीं निजभक्त उदास वर्तती ॥ आशापाश न बाधे त्यांप्रती ॥ ऐसें बोलतां वैकुंठपती ॥ रुक्मिणी चित्तीं विस्मित ॥४४॥
दुसरें दिवसीं प्रातःकाळीं ॥ स्नानासी चालिली संतमंडळी ॥ निंभराज तयांछे मेळीं ॥ चंद्रभागेसी पैं आले ॥४५॥
तंव विचार करी पंढरीनाथ ॥ निंबराजासी द्यावें सुख उचित ॥ जेणेंकरूनि प्रेमभरित ॥ होईल रत मत्कीर्तनीं ॥४६॥
ऐसें म्हणोनि ते वेळ ॥ विप्रवेष धरिला तत्काळ ॥ गळां घालूनि तुळसीमाळ ॥ तमाळनीळ पातले ॥४७॥
डोईस टोपी कमरेंत मेखळा ॥ सुवास बुका भाळीं शोभला ॥ निंबराजासी धनसांवळा ॥ काय बोलिला ते समयीं ॥४८॥
मी स्नानासी जातों भीमरथींत ॥ तस्कर फिरती यात्रेआंत ॥ तरी मेखळा टोपी माळ निश्चित ॥ आपणापासीं असों दे ॥४९॥
ऐसें म्हणोनि रुक्मिणीपती ॥ आभरणें दिधलीं त्याचे हातीं ॥ आपण न लागतां पातया पातीं ॥ अदृश्य जाहले तेधवां ॥१५०॥
निंबराज पाहें सभोंवतें ॥ तों ब्राह्मण सर्वथा न दिसेच तेथ ॥ एक प्रहरपर्यंत ॥ वाट पाहात बैसला ॥५१॥
परी तो नयेचि परतोन ॥ मग संतांसी सांगे वर्तमान ॥ येथें एक येऊनि ब्राह्मण ॥ बोलिला वचन तें ऐका ॥५२॥
म्हणे मी जातों स्नानासी ॥ आभरणें असों देत आपणापासीं ॥ मग माळ टोपी मेखळा मजपासीं ॥ काढोनियां दिधली ॥५३॥
आपण न लागतां पातया पातें ॥ अदृश्य जाहला जेथिंच्या तेथें ॥ मी बैसलों वाट पाहात ॥ चिंताक्रांत होउनी ॥५४॥
तरी अजून नयेचि सर्वथा ॥ यासी विचार काय सांगा आतां ॥ वचन ऐकोनियां संतां । आश्चर्य चित्तां वाटलें ॥५५॥
सकळ बोलती वैष्णवभक्त ॥ ब्राह्मण नव्हे तो रुक्मिणीकांत ॥ तुम्हांसी उचित देऊनि त्वरित ॥ जाहले गुप्त तेचि ठायीं ॥५६॥
तरी आतां संशय न आणूनि मनें ॥ अंगावरी घ्या आभारणें ॥ ऐसीं ऐकोनि संतवचनें ॥ केलें नमन साष्टांग ॥५७॥
मग कमरेंत घातली मेखळा ॥ कंठीं शोभली तुळसीमाळा ॥ टोपी लेवूनि ते वेळां ॥ बुका लाविला संतजनीं ॥५८॥
वाळुवंटीं मिळोनि भक्तमंडळी ॥ निंबराजासी म्हणती ते वेळीं ॥ तुज उचित देऊनि वनमाळी ॥ केली दिवाळी भाविका ॥५९॥
तरी वाळुवंटीं आज उभे राहोन ॥ आपुल्या मुखें करावें कीर्तन ॥ क्षुधित जाहले आमुचे श्रवण ॥ तरी तृप्त करणें तयांसी ॥१६०॥
मग मृदंगाचे स्वरावरी ॥ वीणा मेळविला ते अवसरीं ॥ टाळवोळ मेळवूनि झडकरी ॥ दिव्य पताका उभारिल्या ॥६१॥
वैदिक शास्त्री पौराणिक ॥ संत महंत वैष्णव अनेक ॥ अठरा वर्णांचे बहुत लोक ॥ श्रवणासी देख पातले ॥६२॥
अस्तमानासी चालिला दिन ॥ तेव्हां आरंभिलें कीर्तन ॥ विठ्ठलनामें टाळिया पिटोन ॥ केलें नमन निंबराजें ॥६३॥
अंतरीं आठवूनि रुक्मिणीपती ॥ आनंदाश्रु नेत्रीं वाहती ॥ विमानीं बैसोनि विबुध येती ॥ कौतुक पाहती तेधवां ॥६४॥
साबडें सप्रेम गायन ॥ ऐकोनि वेधले सकळ जन ॥ सज्ञान आणि विचक्षण ॥ तल्लेन होऊन राहिले ॥६५॥
वचनासी चित्तीं असतां प्रेम ॥ तेथेंचि संतोषे पुरुषोत्तम ॥ परी कळा चातुर्य शहाणपण ॥ न लगेचि जाण सर्वथा ॥६६॥
प्रेमावांचूनि केलें गायन ॥ कीं शरीर जैसें प्राणेंविण ॥ कीं लवणांविण रांधिलें अन्न ॥ रुचि नेदीच सर्वथा ॥६७॥
एक सुगंध नसला जरी ॥ तरी ते काय जाळावी कस्तूरी ॥ कीं संतानाविण कांता सुंदरी ॥ तीस घरचारी म्हणों न ये ॥६८॥
नासिकाविण गोरेपण ॥ काय जाळावें तें सुंदर वचन ॥ तेवीं प्रेमेंविण केलें गायन ॥ तयासी कीर्तन न म्हणावें ॥६९॥
कृष्णा रामा मेघश्यामा ॥ गोविंदा गोपाळा पुरुषोत्तमा ॥ अच्युता नरहरे आत्मराया ॥ असों दे प्रेमा निजभजनीं ॥१७०॥
हीं नामें उच्चारूनि सहज ॥ नृत्य करीत निंबराज ॥ मग संतोषोनि गरुडध्वज ॥ काय करिती तेधवां ॥७१॥
बाळरूप धरूनि श्रीपति ॥ मयूरपिच्छें घेतलीं हातीं ॥ मग कौतुक मांडिलें तें संतीं ॥ सादर श्रवणार्थीं परिसावें ॥७२॥
निंबराजाच्या खांद्यावरी ॥ उभे राहोनि श्रीहरि ॥ मोरचेल वारिती निजकरीं ॥ हें नवल परिसा भाविक हो ॥७३॥
जो क्षीरसागरवासी शेषशयन ॥ समुद्रनयेचें अंतरजीवन ॥ तो निजभक्तांवरी जगज्जीवन ॥ चामरें वारितो निजप्रीतीं ॥७४॥
वज्रासनीं बैसले नेहटी ॥ तयांसी लवकरी नेदीचि भेटी ॥ तो निंबराजाचे राहूनि पाठीं ॥ मयूरपिच्छें ढाळीतसे ॥७५॥
नाना याग व्रतें तपराशी ॥ करितां नातुडे साधकांसी ॥ तो दीनदयाळ हृषीकेशी ॥ निजदासांसी सन्मानी ॥७६॥
विरूपाक्ष आंवरूनि मन ॥ एकांती करितो ज्याचें स्मरण ॥ तो भक्तभूषण रुक्मिणीरमण ॥ करी सन्मान दासांचा ॥७७॥
कीर्तनीं पातला धनसांवळा ॥ तेथेंचि आल्या चौसष्ट कळा ॥ आणि चवदा विद्याही अनुकूळा ॥ दिसोनि येती विचक्षणा ॥७८॥
तटस्थ पाहाती सभाजन ॥ चारी प्रहर जाहलें कीर्तन ॥ परे निद्रा आलस्य कोणाकारण ॥ न येचि जाण सर्वथा ॥७९॥
दुष्काळ नाहीं क्षीरसागरासी ॥ रोग न राहे अमृतापासीं ॥ अंधार भास्कराचें गृहासी ॥ राहील कैसा चतुर हो ॥१८०॥
तेवीं प्रेमळाचे कीर्तनांत पाहें ॥ निद्रा आलस्य सहसा नये ॥ टाकूनि जाते वर्णसोये ॥ जाहले एकमय सकळिक ॥८१॥
टाळमृदंगांचे छंदें ॥ टाळिया पिटिती ब्रह्मानंदें ॥ विसरून भेदाभेद द्वंद्वें ॥ नामस्मरणें डोलती ॥८२॥
चार घटिका उरल्यावरी यामिनी ॥ तों नवल वर्तलें तये क्षणीं ॥ एक सावकारकांता वस्त्र पांघरूनी ॥ स्नानालागूनि चालिली ॥८३॥
तिनें दृष्टीस अकस्मात ॥ साक्षात देखिले पंढरीनाथ ॥ मग लगबगां धांवत धांवत ॥ कीर्तनांत पातली ॥८४॥
निंबराजापासीं येऊनि जाणा ॥ पाहूं लागली रुक्मिणीरमणा ॥ तों अदृश्य जाहला जाणा ॥ आश्चर्य मना वाटलें ॥८५॥
मग आक्रोशें करून रुदन ॥ निंबराजाचे धरिले चरण ॥ लोक पुसती तिजकारण ॥ आलीस धांवूनि कां येथें ॥८६॥
दृष्टीस कौतुक देखिलें काय ॥ तें सांगें आम्हांसी लवलाहें ॥ मग सकळांशी नमस्कारूनि पाहें ॥ बोलिली काय तें ऐका ॥८७॥
निंबराजाच्या खांद्यावरी ॥ आतां म्यां देखिला श्रीहरी ॥ मयूरपिच्छें धरूनि करीं ॥ स्वहस्तें वारी निजप्रीतीं ॥८८॥
म्हणूनि धांवूनि आलें त्वरित ॥ तों आतां कांहींच न दिसे येथ ॥ कोठें गेला रुक्मिणीकांट ॥ हें मज निश्चित कळेना ॥८९॥
सांवळा सुकुमार जगजेठी ॥ पुढती पडावा माझे दृष्टी ॥ म्हणोनि चित्तीं होतसे कष्टी ॥ परी नेदीच भेटी सर्वथा ॥१९०॥
लोक आश्चर्य करिती पाहें ॥ म्हणती हें नवल सांगतां नये ॥ मग साक्ष पाहावया लवलाहें ॥ समीप आले विचक्षण ॥९१॥
निंबराजाचे खांद्यावरूनी ॥ अदृश्य जाहले चक्रपाणी ॥ परी बुका टाकिला होता सज्जनीं ॥ त्यावरी पाउलें चिमणीं उमटलीं ॥९२॥
ऐसी साक्ष देखोन ॥ आश्चर्य करिती संत सज्जन ॥ एकमेकांसी आलिंगून ॥ लोटांगण घालिती ॥९३॥
जिणें देखिले होते पंढरीनाथ ॥ तिजला नमिती भाविक भक्त ॥ म्हणती तुझे पदरीं होतें सुकृत ॥ रुक्मिणीकांत देखिला ॥९४॥
यापरी स्तवितां नारी नर ॥ तों उदयासी पातला दिनकर ॥ मग निंबराजें आरती करूनि सत्वर ॥ शारंगधर ओंवाळिला ॥९५॥
पौर्णिमेस केला गोपाळकाला ॥ मग यात्रेचा समुदाय फुटला ॥ तेणें दीनबंधु खंतावला ॥ सद्गदित जाहला निजलोभें ॥९६॥
अबला कन्या सासर्यास जातां ॥ गहिंवरें रडे जैसी माता ॥ तेवीं यात्रा फुटतां पंढरीनाथा ॥ अवस्था पूर्ण जाहली ॥९७॥
रुक्मिणीस म्हणे श्रीहरी ॥ आतां आतां उदास दिसे हे पंढरी ॥ निजभक्त गेले आपुलें घरीं ॥ मज निर्धारीं न कंठे ॥९८॥
आतां उभयतां उठाउठीं ॥ जाऊं तुकयास द्यावया भेटी ॥ ऐसें म्हणोनि जगजेठी ॥ उतावेळ पोटीं जाहले कीं ॥९९॥
गरुडासी पाचारिला सत्वर ॥ सगुणरूप धरिलें साकार ॥ जें अखंड आठवी अपर्णावर ॥ शुद्ध अंतर करोनी ॥२००॥
विनतासुताचे पाठीवरी ॥ रुक्मिणीसहित बैसले हरी ॥ इच्छामात्रें झडकरी ॥ देहु ग्रामासी पावले ॥१॥
तों इकडे वैष्णव तुकया वा णी ॥ उतावीळ वाट पाहे मनीं ॥ म्हणे कधीं येईल चक्रपाणी ॥ माता रुक्मिणीसमवेत ॥२॥
आजि उजवा लवतो माझा नयन ॥ घडीघडी बाहु करी स्फुरण ॥ क्षणक्षणा वाटे समाधान ॥ हे उत्तम शकुन होताती ॥३॥
तों आकाशपंथें अकस्मात ॥ गरुडटका देखिला झळकत ॥ मग सामोरा होऊनि त्वरित ॥ घाली दंडवत निजप्रेमें ॥४॥
मग निजभक्ताचा प्रेमभावो ॥ देखोनि प्रकटले देवाधिदेवो ॥ ब्रह्मादिकांसी ज्याचा ठावो ॥ नेणेचि पहा वो सर्वथा ॥५॥
रूप सांवळे अति सुकुमार ॥ कांसे वेष्टिला पीतांबर ॥ दिव्य कुंडलें मकराकार ॥ कौस्तुभ सुंदर शोभत ॥६॥
मुगुट विराजे देदीप्यमान ॥ त्यावरी जडलीं दिव्य रत्नें ॥ पदक एकावळी भूषणें ॥ जगज्जीवनें घातलीं ॥७॥
चरणीं नेपुरें वाळे वाजती ॥ ते ध्वनी ऐकूनि लाजती श्रुती ॥ रुक्मिणीसहित जगत्पती ॥ प्रगट जाहले तेधवां ॥८॥
ऐसें रूप देखोनि नयनीं ॥ तुकयासी हर्ष वाटला मनीं ॥ सप्रेम आलिंगन देऊनी ॥ मिठी चरणीं घातली ॥९॥
पुढील अध्यायीं सुरसवाणी ॥ देवभक्तांसीं होतील बोलणीं ॥ तें सादर होऊनि संतसज्जनीं ॥ परिसावें श्रवणीं निजप्रीतीं ॥२१०॥
जें प्रेमगंगेचें जीवन सुरस ॥ कीं आनंदसमुद्रींचा सुधारस ॥ महीपति विनवी श्रोतयांस ॥ सेवा सावकाश निजप्रीतीं ॥११॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ एकपंचाशततमाध्याय रसाळ हा ॥२१२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्रीरस्तु ॥
श्रीभक्तविजय एकपंचाशत्तमाध्याय समाप्त