अंजनीसुत प्रचंड
अंजनीसुत प्रचंड । वज्रपुच्छ कालदंड । शक्ति पाहतां वितंड । दैत्य मारिले उदंड ॥१॥
धगधगी तसी कळा । वितंड शक्ति चंचळा । चळचळीतसे लिळा । प्रचंड भीम आगळा ॥२॥
उदंड वाढला असे । विराट धाकुटा दिसे । त्यजून सूर्यमंडळा । नभांत भीम आगळा ॥३॥
लुलीत बाळकी लिला । गिळोनि सूर्यमंडळा । बहूत पोळतां क्षणीं । थुकिलाहि तत् क्षणीं ॥४॥
धगधगीत बूबळा । प्रत्यक्ष सूर्यमंडळा । कराल काळमूख तो रिपूकुळासि दु:ख तो ॥५॥
रुपें कपी अचाट हा । सुवर्ण कट्ट कासतो । फिरे उदास दास तो । खळास काल भासतो ॥६॥
झळक झळक दामिनी वितंड काल कामिनी । तयापरी झळाझळी । लुलित रोमजावळी ॥७॥
समस्त प्राणनाथ रे । करी जना सनाथ रे । अतूळ तूळणा नसे । अतूळशक्ति वीलसे ॥८॥
रुपें रसाळ बाळकू । समस्त चित्त चाळकू । कपी परंतु ईश्वरू । विशेष लाधला वरू ॥९॥
स्वरुद्र क्षोभल्यावरी । तयासि कोण सांवरी । गुणागळा परोपरी । सतेजरूप ईश्वरी ॥१०॥
समर्थ दास हा भला । कपीकुळांत शोभला । सुरारिकाळ क्षोभला । त्रिकूट जिंकिला भला ॥११॥
॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥३॥