हनुमंता रामदूता
हनुमंता रामदूता । वायुपुत्रा महाबला ॥ ब्रह्मचारी कपीनाथा । विश्वंभरा जगत्पते ॥१॥
दानवारि कामांतका । शोकहारी दयानिधे ॥ महारुद्रा मुख्य प्राणा । मूळमूर्ति पुरातना ॥२॥
वज्रदेही सौख्यकारी । भीमरूपा प्रभंजना ॥ पंचभूता मूळ माया । तूंचि कर्ता समस्तहि ॥३॥
स्थितीरूपें तूंचि विष्णु । संहारक पशूपते ॥ परात्परा स्वयंज्योति । नामरूपा गुणातिता ॥४॥
सांगतां वर्णिता येना । वेदशास्रा पडे ठका । शेष तो शिप्पला भारी । नेति नेतिपरा श्रती ॥५॥
धन्यावतार कैसा हा । भक्तांलगिं परोपरी । रामकाजीं उतावेळा ॥ भक्तां रक्षक सारथी ॥६॥
वारितो दुर्धटे मोठीं । संकटीं धांवतो त्वरें । दयाळ हा पूर्ण दाता । नाम घेतांच पावतो ॥७॥
धीर वरि कपी मोठा । मागें नव्हेचि सर्वथा ॥ उड्डाण अद्भुत जें ज्याचें । लंघिलें समुद्राजळा ॥८॥
देउनी लिखिता हाती । नमस्कारी सितावरा । वाचितां सौमित्र अंगें । राम सुखें सुखावला ॥९॥
गर्जती स्वानंदमेळीं । ब्रह्मानंदें सकळहि ॥ अपार महिमा मोठा । ब्रह्मांदिकांसि नाकळे ॥१०॥
अद्भुत पुच्छ तें कैसें । भोवंडी नभपोकळी ॥ फांकलें तेज तें भारी । झांकिलें सूर्यमंडळा ॥११॥
देखतां रूप पैं ज्याचें । उड्डाण अद्भुत शोभलें । ध्वजांग ऊर्ध्व तो बाहु । वामहस्त कटावरी ॥१२॥
कसिली हेमकासोटी । घंटा किंकिण भोंवत्या ॥ मेखळे जडलीं मुक्तें । दिव्य रत्नें परीपरीं ॥१३॥
माथां मुगुट तो कैसा । कोंटि चंद्रार्क लोपले ॥ कुंडलें दिव्य तीं कानीं । मुक्तामाला विराजते ॥१४॥
केशर रेखिले भाळीं । मुख सुहास्य चांगलें । मुद्रिका शोभती बोटी । कंकणें कर मंडित ॥१५॥
चरणीं वाजती अंदू । पदीं तोडर गर्जती । कैवारी नाथ दीनाचा । स्वामि कवल्यदायकू ॥१६॥
स्मरतां पाविजे मुक्ति । जन्ममृत्यूसि वारितो ॥ कांपती दैत्य तेजासी । भुभु:कार देतां बळें ॥१७॥
पाडितो राक्षसू नेटें । आपटी महिमंडळा । सौमित्र-प्राणदाताचि । कपिकुळांत मंडणू ॥१८॥
दंडिली पाताळशक्ति । अही मही निर्दाळिले ॥ सोडिलें रामचंद्राला । कीर्ति हे भुवनत्रयीं ॥१९॥
विख्यात ब्रीद तें कैसें । मोक्षदाता चिरांजिवी । कल्याण त्याचेनि नामें । भूत पीशाच कांपती ॥२०॥
सर्प वृश्चिक पश्वादि विष शीत निवारण ॥ आवडी स्मरतां भावें । काळ कृतांत धाकतो ॥२१॥
संकटें बंधनें बाधा । दु:ख दारिद्रनाशका । ब्रह्मग्रहपिडाव्याधि । ब्रह्महत्यादि पातकें ॥२२॥
पूरवी सकळही आशा । भक्तकामकल्पतरू ॥ त्रिकाळीं पठतां स्तोत्र । इच्छिलें पावसी जनीं ॥२३॥
परंतु पाहिजे भक्ति । संधि कांहीं धरूं नका ॥ रामदासा सहाकारी । सांभाळीतो परोपरी ॥२४॥
॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥४॥